Dainik Maval News : जीवाला अपाय व्हावा यासाठी सासूने आपल्यावर तंत्र-मंत्राचा प्रयोग केल्याचा गंभीर आरोप सुनेने सासूवर केला, तसेच आपला शारिरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केल्याची फिर्याद विवाहितेने दाखल केली असून त्यानुसार सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे येथे ही घटना घडली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
विवाहितेने याबाबत निगडी पोलिसांत फिर्यादी दिली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सुनेच्या तक्रारीनंतर सासरकडील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती (वय 32), सासू (वय 55), आजी सासू (वय 68), दीर (वय 29), आणि दोन स्त्री पुरूष (सर्व रा. तळेगाव दाभाडे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ( case has been filed against 6 in-laws for torturing a married woman talegaon dabhade )
दिनांक 15 मे 2023 ते 23 नोव्हेंबर 2023 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे हा प्रकार घडला. 26 वर्षीय विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मात्र, तळेगाव दाभाडे पोलिस क्षेत्रात हा गुन्हा घडल्याने पुढील तपासासाठी निगडी पोलिसांनी गुन्हा तळेगाव पोलिसांकडे वर्ग केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी विवाहितेचा वेगवेगळ्या प्रकारे शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ केला असल्याचे तसेच लग्नात स्त्रीधन म्हणून मिळालेले दागिने सासूने आपल्याकडेच ठेवून घेतले. तंत्र मंत्र करून फिर्यादी यांच्या जिवाला अपाय करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांना स्टुलवरून धक्का देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस तपास करित आहेत.
अधिक वाचा –
– आनंदाची बातमी ! गौरी गणपती उत्सवानिमित्त 1 कोटी 70 लाखापेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’
– आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने तळेगाव दाभाडे शहरात नवीन मतदार नोंदणी अभियान
– तिहेरी हत्याकांड प्रकरण : अखेर ‘त्या’ तिन्ही मायलेकरांचा शोध थांबवला, नदीची पाणीपातळी वाढल्याने निर्णय । Talegaon News