Dainik Maval News : धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेची पंचविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.28) सुशीला मंगल कार्यालय येथे संपन्न झाली. यावेळी सभासदांना यावर्षी दहा टक्के लाभांश जाहीर केला. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विनोद टकले होते. यावेळी आमदार सुनील शेळके, श्रीमंत सरदार सत्यशीलराजे दाभाडे, संस्थापक खंडोजी टकले, मावळ तालुका भाजपा महिला अध्यक्ष सायली बोत्रे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे आदि मान्यवर उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सभेत शिवव्याख्याते नामदेवराव जाधव यांनी एकविसाव्या शतकातील उद्योजकता यावर मार्गदर्शन केले. यावेळी संचालक संतोष परदेशी यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली तर दैनंदिन बचत प्रतिनिधी समाधान शिंदे,प्रवीण वडनेरे,दत्ता भेगडे, शैलेश वहिले यांचा त्यांनी केलेल्या विशेष कामाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ( Dharamveer Sambhaji Nagari Cooperative Credit Union Annual meeting Talegaon Dabhade )
25 व्या रोप्य महोत्सवी सर्वसाधारण सभेत संस्थेची आर्थिक स्थिती सुदृढ असल्याचं सचिव संजय शिंदे यांनी अहवाल वाचनामध्ये स्पष्ट केलं. उपाध्यक्ष जितेंद्र बोत्रे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन व्यवस्थापिका सुनिता शेंडे व शितल शेटे यांनी केले. सभेच्या नियोजनासाठी दत्तात्रय शिंदे, दत्तात्रय पिंजण, केशव कुल व निमंत्रित सदस्यांनी विशेष प्रयत्न केले. आभार विजय शेटे यांनी मानले.
अधिक वाचा –
– चाकण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री अजित पवार सरसावले । Pune News
– वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ नेमकी काय ? कुणाला मिळणार मोफत सिलिंडर? वाचा सविस्तर
– शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या ; मावळ तालुका काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन