व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची मोठी कारवाई ! मावळात दोन ठिकाणी अंमली पदार्थांसह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांचा संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत कारवायांचा धडाका सुरूच; दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सव्वा लाखांच्या एम.डी पावडरसह सुमारे 18 लाखांचा मुद्देमाल जप्त; पाच जण जेरबंद

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 1, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळा विभागात अमली पदार्थांची चोरून विक्री होत असुन त्यामुळे परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती कार्तिक यांना मिळाली होती. त्यासाठी श्री सत्यसाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेऊन त्याअंतर्गत परिसरातील युवकांमध्ये जनजागृती करणे, तसेच अमली पदार्थांचे सेवन, साठवणुक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

संकल्प नशामुक्ती अभियानाचाच एक भाग म्हणून श्री सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अमलीपदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसात कठोर कायदेशीर कारवाया करून अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांचेकडून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ हस्तगत केले आहेत. दिनांक 29/07/2024 रोजी सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, मौजे पाथरगाव गावचे हद्दीत काही इसम हे चारचाकी वाहनातून एम.डी हा अमली पदार्थ विक्रीकरिता घेऊन येणार आहेत. त्यानुसार श्री सत्यसाई कार्तिक यांचे पथकाने परिसरात सापळा रचला होता.

मिळालेल्या बातमीप्रमाणे दि.29/07/2024 रोजी रात्री 11.40 वाजताच्या सुमारास मौजे पाथरगाव जवळ, जुने मुंबई पुणे हायवे रोडवरील हॉटेल मावळ माची समोर एक संशयित वाहन थांबल्याने कार्तिक व पथकाने सदर वाहन थांबवून गाडीतील इसमांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने व त्यांच्यावर संशय बळावल्याने पोलीस पथकाने जागेवरच पंचांसमक्ष नमूद इसमांचे घेतलेल्या झडतीमध्ये नमूद इसमांचे ताब्यात एकूण 5.05 ग्रॅम एम.डी पावडर मिळून आल्याने सदरचा माल पंचांसमक्ष सीलबंद करून ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच नमूद इसमांकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा माल हा विक्रीकरीता घेऊन जात असल्याचे सांगितले आहे.

सदरच्या कारवाई मध्ये इसम नामे 1)योगेश केशव गायकवाड, रा.कांब्रे, तालुका मावळ, जिल्हा पुणे , 2)नारायण सोपान दाभाडे, रा. व्हिजन सिटी, जांभूळ, तालुका मावळ जिल्हा पुणे यांना त्यांचे चारचाकी वाहनासह ताब्यात घेऊन कामशेत पो.स्टे येथे आणून सदरबाबत पो. शि अमोल ननवरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून कामशेत पो.स्टे. गु र.न. 157/2024 एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 चे कलम 8(क), 21(ब) (क), तथा भारतीय न्याय संहिता कलम 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास कामशेत पो.स्टे चे पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील हे करत आहेत.

तसेच दिनांक 30/07/2024 रोजी श्री सत्यसाई कार्तिक यांचे पथकाने त्यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार लोणावळा शहर पो.स्टे हद्दीतील मौजे नांगरगाव गावचे हद्दीत टाकलेल्या छाप्यात इसम नामे 1)शाहरुख असलम शेख, राहणार केवरे वसाहत लोणावळा, तालुका मावळ जिल्हा पुणे, 2)नितीन भरत कालेकर, राहणार केवरे वसाहत, तालुका मावळ, जिल्हा पुणे, 3) साजीद अकबर शेख, राहणार टेबल चाळ, लोणावळा, तालुका मावळ जिल्हा पुणे हे त्यांचे ताब्यातील केटीएम ड्यूक दुचाकीवरून एम.डी पावडर विक्रीकरिता घेऊन जात असताना मिळून आल्याने पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीमध्ये त्यांचे ताब्यातून एकूण 7.1 ग्रॅम एम.डी पावडरसह सुमारे 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरबाबत पो. शि सुभाष शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.न.323/2024 एन.डी.पी एस ॲक्ट 1985 चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा शहर पो.स्टे चे पोलीस उपनिरीक्षक रोहन पाटील करत आहेत.

Novel NIBR Ads

संकल्प नाशामुक्ती अभियानांतर्गत केलेल्या वरील दोन कारवायांमध्ये रु.1,22,210/- ( अक्षरी एक लाख बावीस हजार दोनशे दहा) रु.किमतीच्या एकूण 12.15 ग्रॅम एम.डी पावडर सह एकूण रु.18,25,000/- (अक्षरी – अठरा लाख पंचेवीस हजार) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पोलीस यंत्रणा सखोल तपास करत आहे. सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक, सहा पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, पो.हवा अंकुश नायकुडे, पो.ना दत्ता शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ अंकुश पवार, पो. कॉ अमोल ननवरे, पो.कॉ महेश थोरात, पो.कॉ गणेश ठाकुर , पो.कॉ प्रतीक काळे यांचे पथकाने केली आहे.

अधिक वाचा –
– चाकण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री अजित पवार सरसावले । Pune News
– वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ नेमकी काय ? कुणाला मिळणार मोफत सिलिंडर? वाचा सविस्तर
– शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या ; मावळ तालुका काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन


dainik maval jahirat

Previous Post

धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचविसाव्या वार्षिक सभेत सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर । Talegaon Dabhade

Next Post

देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतची कोंडी फूटणार ; नवीन डीपीआर मंत्रीमंडळासमोर, खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Highway From Dehu Road to Chandni Chowk

देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतची कोंडी फूटणार ; नवीन डीपीआर मंत्रीमंडळासमोर, खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

drowning

मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 23, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

होणाऱ्या बायकोनेच केला गेम? लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाला नवे वळण, आज पोलिसांची पत्रकार परिषद

June 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.