Dainik Maval : मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद वाढताना दिसत आहे. लोकसभा निवडणूकीत महाविकासआघाडीची ताकद दिसून आल्याने अनेक कार्यकर्ते, नेते मविआतील घटकपक्षात प्रवेश करत आहेत. नुकतीच मावळच्या ग्रामीण भागातील अनेकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात एन्ट्री केली असून पुण्यातील मोदीबागेत हा प्रवेश सोहळा झाला. यासह सर्वांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
नवनाथ भगवान राणे, मा सरपंच खांडशी नेसावे, जनाबाई शिमग्या वाघमारे मा उपसरपंच खांडशी नेसावे, लक्ष्मण झिमा आखाडे मा सदस्य खांडशी नेसावे, शिमग्या पांडुरंग वाघमारे, मनोज महादू हिलम आणि कांब्रे गावातील उद्योजक मच्छिंद्र गायकवाड आणि सुधीर गायकवाड दिग्विजय देवकर यांंनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, जिल्हा युवक कार्याध्यक्ष प्रमोदसिंह गोतारणे उपस्थित होते. ( Many Leader In Maval taluka joined NCP Sharad Chandra Pawar party )
पक्षप्रवेशानंतर सर्वांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर मावळ तालुक्यात त्याचे पडसाद लगेच दिसून आले नाही. परंतू काही काळाने तालुक्यात शरद पवार यांना मानणाऱ्या नेत्यांनी तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अस्तित्व दाखवून दिले.
अधिक वाचा –
– ‘अभी नहीं तो कभी नहीं…’ भाजपाच्या विजयी संकल्प मेळाव्यात मावळ विधानसभा लढविण्याचा निर्धार । Maval BJP News
– स्व. संकेतदादा असवले प्रतिष्ठानकडून सामाजिक बांधिलकी जपण्याची परंपरा कायम ; विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप । Maval News
– देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतची कोंडी फूटणार ; नवीन डीपीआर मंत्रीमंडळासमोर, खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती