Dainik Maval News : वडगाव मावळ येथे शिवक्रांती कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून भव्य कामगार मेळावा आणि वेतनवाढ स्वाक्षरी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामगार व व्यवस्थापन यांना जोडणारा दुवा म्हणजे शिवक्रांती कामगार संघटना असल्याच्या भावना अनेक कामगार प्रतिनिधींनी व्यक्त केल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र समन्वयक विनोद साबळे, शिवक्रांती कामगार संघटना सरचिटणीस विजय पाळेकर, खजिनदार रविंद्र साठे, चिटणीस गुलाबराव मराठे, लोणावळा शहर भाजपा अध्यक्ष अरुण भाऊ लाड, लोणावळा शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रथमेश पाळेकर यांच्यासह शिवक्रांती कामगार संघटनेचे पदाधिकारी व सभासद बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Kamgar Melava of Shivkranti Kamgar Sanghatana at Vadgaon Maval )
कामगारांचा आवाज विधी मंडळात बुलंद होणे गरजेचे आहे. कामगारांचे प्रश्न विधी मंडळात मांडणाऱ्या नेत्याच्या मागे कामगार उपस्थित राहतील. शिवक्रांती संघटना केवळ पगार वाढीसाठी मर्यादित नाही तर एक कुटूंब आहे. प्रत्येक कामगारांच्या सुख दुःखात संघटना व प्रतिनिधी सहभागी असतात. प्रत्येक कामगाराचे घर व्हावे याकरीता आमचे प्रयत्न सुरू आहेत. कामगारांचे अनेक प्रश्न आज प्रलंबित आहेत. कामगारांना चांगल्या सुविधा व पगार देणाऱ्या कंपनीला शासनाने देखील सवलत व पाठबळ देणे गरजेचे असल्याचे शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस ॲड विजयराव पाळेकर यांनी सांगितले.
तसेच रविंद्र भेगडे यांनीही शिवक्रांती कामगार संघटनेच्या सभासद बांधवांना संबोधित केले. कष्टकरी कामगार बांधवांना त्यांच्या कष्टाचा उचित योग्य मोबदला देण्यासाठी कामगार संघटनांचे योगदान अनन्यसाधारण आहे. स्थलांतरित कामगारांसाठी घर उभारण्यासाठी संघटना करत असलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. भांडवलदारांसोबत योग्य समन्वय आणि कामगारांचे हित नजरेसमोर ठेवून काम करणाऱ्या शिवक्रांती सारख्या कामगार संघटना जोवर आहेत तोवर कामगार चळवळ अधिक बळकट होत राहील असे प्रतिपादन केले.
अधिक वाचा –
– चांदखेड येथे अज्ञात भरधाव वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकीचालक तरूणाचा मृत्यू, सहप्रवासी गंभीर । Maval News
– अजित पवारांकडून मावळातील विकासकामांचा आढावा; टाकवे व मळवली पुलांच्या कामाबाबत नाराजी ; लोणावळा, कान्हे रुग्णालये लवकरच जनसेवेत
– शेतकऱ्यांनो… बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी आता १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, असा करा अर्ज