Dainik Maval News : दिनांक 2 ऑगस्ट रोजी वडगाव मावळ येथे भारतीय जनता पार्टीचा विजयी संकल्प मेळावा संपन्न झाला. याला भाजपा कार्यकर्ता आक्रोश मेळावा म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक छोटा-मोठा कार्यकर्ता या मेळाव्यात स्वयंस्फूर्तीने सहभागी झाला, व्यक्त झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
हा मेळावा यशस्वी होण्यामागे भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे यांचा सिंहाचा वाटा दिसून आला. मावळ विधानसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणूकीत मोठ्या पराभवानंतर स्वतः पक्षाची कमान हाती घेत प्रत्येक जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणांत फिरून कार्यकर्त्यांना बळ देऊन रविंद्र आप्पा भेगडे यांनी आपल्या संघटन कौशल्याची चुणूक दाखवून दिली.
मावळात भाजपाची गळचेपी –
सध्या मावळ विधानसभेमध्ये भाजपा आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांची गळचेपी सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, विविध कार्यकारी सोसायट्यांमध्ये विद्यमान आमदारांच्या समर्थकांकडून मूळ निष्ठावान भाजपा कार्यकर्त्यांची गळचेपी होत असताना “असंतोषाचा चेहरा” म्हणून रविंद्र आप्पा भेगडे निडरपणे समोर आल्याची चर्चा, वक्तव्ये भाजपाच्या गोटातून होत आहे.
विजय संकल्प मेळाव्याला त्यांना मिळालेला कार्यकर्त्यांचा उदंड प्रतिसाद हे त्याचे द्योतक म्हणावे लागेल. मेळाव्यात देखील रवि आप्पा, आता तुम्ही थांबू नका ! अशी कार्यकर्त्यांची मागणी होताना दिसून आली होती. ( Ravindra Bhegde name is being discussed in BJP for Maval Vidhansabha Elections )
अधिक वाचा –
– म्हशी चरायला गेल्या पण परत आल्याच नाहीत, पुसाणे येथील दुर्दैवी घटना । Maval News
– श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेत ‘मुख्यमंत्री – माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाची वृक्षारोपणाने सुरूवात । Karla News
– वडगाव येथे शिवक्रांती कामगार संघटनेचा कामगार मेळावा आणि वेतनवाढी स्वाक्षरी समारंभ संपन्न । Vadgaon Maval