Dainik Maval News : कार्ला येथील आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी साधारण 45 लाख भाविक येतात. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी मंदिराच्या जीर्णोद्धाराची कामे करण्यात येत आहेत. वेहेरगाव येथील श्री एकवीरा देवी मंदिर येथे फनिक्युलर रेल्वे उभारण्यासंदर्भातील कामांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पामुळे श्री एकविरा देवी मंदिरात 5 मिनिटांमध्ये पोहोचता येणार आहे. या प्रकल्पाची गतीने उभारणी करताना भाविकांच्या सुरक्षिततेची देखील काळजी घ्यावी. या रेल्वे उभारणीचा प्रस्ताव पायाभूत समितीकडे सादर करण्यात आला असल्याने हा प्रकल्प लवकर सुरू होण्यासाठी पायाभूत समितीला विनंती करण्यात यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात आढावा घेतला. या बैठकीस क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार सुनील शेळके, अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, वित्त विभागाच्या सचिव शैला ए., सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, क्रीडा विभागाचे आयुक्त राजेश देशमुख आदी उपस्थित होते. पुणे विभागाचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पुणे महानगर आयुक्त योगेश म्हसे आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील विविध विकासकामांना मान्यता देऊन भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या निधीतून सुरु असलेल्या विकासकामांना गती देऊन ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करावीत. त्याचप्रमाणे प्रस्तावित विकासकामांची निविदा प्रक्रिया पार पाडून प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी. मावळ विधासनभा मतदारसंघातील पूर्ण झालेल्या विकासकामांचे उद्घाटन आणि निविदा प्रक्रिया झालेल्या कामांचे भूमीपूजन सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला घेण्याबाबतची तयारी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित शासकीय यंत्रणांना दिले. ( Technical Approval for Construction of Funicular Railway at Ekvira Devi Temple Karla DCM Ajit Pawar )
फनिक्युलर रेल्वे म्हणजे काय?
डोंगराळ भागात किंवा एखाद्या कड्यावर केबलच्या साहाय्याने ही रेल्वे चालवली जाते. या रेल्वेच्या डब्यांखाली आऱ्यांसारखी रचना असते. त्यातून ही केबल किंवा चेन टाकलेली असते. ते आरे फिरायला लागल्याने त्या केबलच्या माध्यमातून ही रेल्वे पुढे सरकते. उंच चढाच्या ठिकाणी त्याचा उपयोग होतो.
अधिक वाचा –
– वडगावात दोन जखमी मोरांना जीवदान । Vadgaon Maval
– म्हशी चरायला गेल्या पण परत आल्याच नाहीत, पुसाणे येथील दुर्दैवी घटना । Maval News
– श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेत ‘मुख्यमंत्री – माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाची वृक्षारोपणाने सुरूवात । Karla News