Dainik Maval News : अंपग कल्याण निधीअंतर्गत कार्ला गावातील 18 लाभार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा धनादेश माजी पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे,कार्ला ग्रामपंचायत सरंपच दीपाली हुलावळे व उपसरपंच किरण हुलावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. या वेळी लाभार्थ्यांना ह्या रकमेतून त्यांच्या परिवाराला हातभार लागावा यासाठी हा निधी देण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
या वेळी सदस्या भारती मोरे, उज्वला गायकवाड, सोनाली मोरे, वत्सला हुलावळे, सदस्य सागर जाधव, सचिन हुलावळे, सनी हुलावळे, नंदकुमार पदमुले, ग्रामसेवक सुभाष धोत्रे, शिवाजी म्हाळस्कर, संतोष हुलावळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व कार्ला ग्रामस्थ उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंदाजपत्रकापैकी तीन टक्के निधी अपंगांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक अाहे. हा निधी अपंगांच्या कल्याणासाठी खर्च करण्यात येताे. ( Disability Welfare Fund checks distributed to 18 disabled persons by Karla Gram Panchayat )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे शहराला आंद्रा धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा ; अजित पवारांनी मागवला अहवला । Maval News
– मोठी बातमी ! आदिवासीबहुल गावांमध्ये आदिवासी दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर, मावळातील गावांचा समावेश
– प्राथमिक शाळेत मुलांना मिळणार संगणक विद्या, इंदोरीतील दोन शाळांना संगणक संच भेट । Maval News