व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वाढदिवस विशेष : पाच वेळा मावळ विधानसभा लढवली, दोन वेळा आमदार झाले, एक आमदारकी फक्त 459 मतांनी गेली

भारतीय जन संघ ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - असा होता कृष्णराव भेगडे यांचा राजकीय प्रवास

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 10, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Former Maval Vidhan Sabha MLA Krishnarao Bhegde

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्याचे खऱ्या अर्थाने भूषण असलेले माजी आमदार कृष्णराव भेगडे हे आज (दि. 10 ऑगस्ट) त्यांचा 89 वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या 89 व्या वर्षी देखील जनसामान्यांच्या हिताचाच विचार करणारे कृष्णराव भेगडे मावळ विधानसभेचे दोन टर्मचे आमदार आहेत. तसेच त्यांनी पाच वेळा विधानसभा लढविली होती. शरद पवार यांचे खंदे समर्थक राहिलेले कृष्णराव भेगडे यांचा प्रवास भारतीय जन संघ ते काँग्रेस ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा राहिलेला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

अवघ्या 459 मतांनी गेली पहिली आमदारकी –
1967 साली कृष्णराव भेगडे यांनी पहिल्यांदा मावळ विधानसभा लढवली. तत्पूर्वी 1962 पासून मावळ विधानसभा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. 1967 साली काँग्रेसचे रघुनाथ शंकर सातकर यांच्या विरोधात भारतीय जनसंघाचे कृष्णराव धोंडिबा भेगडे अशी लढत झाली. या निवडणूकीत अवघ्या 459 मतांनी कृष्णराव भेगडे यांचा पराभव झाला. रघुनाथ सातकर यांना 19525 मते मिळाली, तर कृष्णराव भेगडे यांना 19066 मते मिळाली आणि फक्त 459 मतांनी त्यांची आमदारकी गेली.

पराभवानंतर जोमाने काम केले आणि इतिहास घडविला –
1967 च्या निवडणूकीतील पराभवानंतर कृष्णराव भेगडे जोराने कामाला लागले. पुन्हा त्यांनी मतदारसंघ बांधला. भारतीय जन संघाचे विचार तळगाळापर्यंत रुजवले आणि 1972 च्या निवडणूकीत रघुनाथ सातकर यांचाच तब्बल 3636 मतांनी पराभव केला आणि मावळ विधानसभेवर भारतीय जनसंघाचा झेंडा फडकविला. पहिल्या टर्ममध्ये केलेल्या लोकोपयोगी कामांमुळे त्यांनी 1978 च्या निवडणूकीतही बाजी मारली. परंतु यावेळी ते काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर आमदार झाले. त्यांनी तेव्हा स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टी आघाडीचे नथूभाई भेगडे यांचा तब्बल 9333 मतांनी पराभव केला. मावळ विधानसभेच्या स्थापनेनंतर सलग दोनवेळा आणि दोन वेगवेगळ्या पक्षाकडून आमदार बनलेले कृष्णारव भेगडे हे एकमेव आमदार होते.

पक्ष बदल आणि पराभव –
1978 नंतर काँग्रेसमध्ये फूट पडली. सोबत जनता पार्टीचे सरकार देखील कोसळले. यावेळी कृष्णराव भेगडे हे इंदिरा गांधी यांच्या विरोधात स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय कांग्रेस (यू) गटात दाखल झाले. त्यामुळे अवघ्या दोन वर्षांत 1980 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणूकांत त्यांनी इंदिरा गांधी यांच्या INC (I) पक्षाचे आमदार बी. एस. गाडे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली. या निवडणूकीत कृष्णराव भेगडे यांचा निसटता म्हणजे अवघ्या 1,532 मतांनी पराभव झाला.

त्यानंतर पुढील दशकात त्यांनी काँग्रेस सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ केली. शरद पवार यांच्या एनसीपी च्या स्थापनेनंतर 1999 झालेल्या निवडणूकीत त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या दिगंबर बाळोबा भेगडे यांच्या विरोधात निवडणूक लढविली. मात्र च्या निवडणूकीत त्यांचा तब्बल 16,245 मतांनी पराभव झाला. या पराभवानंतर मात्र त्यांनी पुन्हा निवडणूक न लढवता पक्ष कार्यात स्वतःला गुंतवून घेतले. ( Former Maval Vidhan Sabha MLA Krishnarao Bhegde Political Journey Biography Information in Marathi )

अधिक वाचा –
– क्रांती दिनी, भिडले राजकारणी ; श्रद्धांजलीच्या पावसात, राजकारण जोरात
– तयारी विधानसभा निवडणूकीची : संपूर्ण पुणे जिल्ह्यात ८४ लाख मतदार ; पाहा जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभेतील मतदारसंख्या । Vidhansabha Election 2024
– टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट येथील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पावर अजित पवारांचे विशेष लक्ष ; संबंधित विभागांना महत्वाच्या सुचना


dainik maval jahirat

Previous Post

शिवसेना मावळ परिवाराकडून एक्सप्रेस वे वरील ‘त्या’ ठिकाणी शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण । Maval News

Next Post

नवउद्योजकांना प्रशिक्षणाची संधी, महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीचा उपक्रम – वाचा सविस्तर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Startup

नवउद्योजकांना प्रशिक्षणाची संधी, महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीचा उपक्रम - वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.