Dainik Maval News : आमदार सुनिल शेळके यांनी सुरू केलेल्या आदिम सेवा अभियानाच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील आदिवासी समाजातील नागरिकांना विविध सरकारी योजनांचे लाभ मिळवून देणे, त्यांना दाखले मिळवून देणे या सेवा देण्याचे काम गेली साडेचार वर्षापासून सुरू आहे. त्यानुसार, आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव मावळ येथील मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगाव – कातवी शहरामधील ठाकर समाजातील 10 कुटुंबीयांना जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज देखील भरून घेण्यात आले. आदिवासी समाजातील नागरिक गेली कित्येक वर्षांपासून जातीचे दाखले नसणे आणि अन्य कागदपत्रे नसल्याने शासकीय योजनांपासून वंचित आहेत. परंतू आता हे दाखले मिळाल्याने दहाही कुटुंबीयांना विविध शासकीय योजना, कुटुंबातील मुलांना शैक्षणिक योजनांचे लाभ घेता येणार आहेत. यासह, अजूनही दाखल्यांपासून वंचित राहिलेल्या ठाकर समाजातील काही कुटुंबीयांना जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी दिली. ( Distribution of caste certificates to ten tribal families through Moraya Pratishthan at Vadgaon Maval )
वडगाव शहराचे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या उपस्थितीत मोरया प्रतिष्ठान कार्यालयात सदर कुटुंबीयांना जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. आमदार सुनिल शेळके जनसंपर्क कार्यालयातील सचिन वामन, रुपेश सोनुने, यशवंत शिंदे यांचे दाखले मिळविणे कामी मोलाचे सहकार्य मिळाले. वडगाव शहरातील ठाकर, आदिवासी, कातकरी समाजातील अनेकजण जातीच्या दाखल्यापासून वंचित असल्याने हे अभियान असेच सुरू ठेवून अधिकाधिक आदिवासी बांधवांना हक्काचे दाखले मिळवून देणार असल्याचे यावेळी ढोरे यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– पीएम-किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 1 हजार 698 कोटी 70 लाख रुपये जमा
– मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय, लाखो नागरिकांना होणार लाभ
– नगराध्यक्षांचा कालावधी आता अडीच ऐवजी पाच वर्षे ; राज्य सरकारचे अनेक मोठे निर्णय, वाचा सविस्तर