व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. ६ मार्च) विधानसभेत सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 7, 2026
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
What exactly did Pune district get in budget presented by Chief Minister Devendra Fadnavis Find out

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. ६ मार्च) विधानसभेत सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार प्रमुख स्तंभांवर आधारित असून प्रत्येक स्तंभांत चार उपक्षेत्रांचा समावेश करून एकूण १६ उपक्षेत्रांवर विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्यातील शेतकरी, पायाभूत सुविधा, धार्मिक वारसास्थळे आणि औद्योगिक वाढ यांना चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या रुपाने दिलासा
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीककर्ज थकित असलेल्या पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. तसेच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.

यासोबतच बँकिंग व्यवस्था सक्षम करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्यासाठी समितीच्या शिफारसीनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. स्व. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचाही समावेश करण्यात आला आहे. बारामती व पुरंदर तालुक्यातील अवर्षणप्रवण भागाला पिण्याचे पाणी आणि सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

वारसास्थळांचा विकास
पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक व धार्मिक वारसास्थळांच्या विकासालाही अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे. आंबेगाव तालुक्यातील शिवसृष्टी परिसर विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या तुळापूर येथील स्मारकाचे काम जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून वढू बुद्रूक येथील समाधीस्थळाचा विकास जून २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.तसेच जगद्गुरु तुकाराम महाराजांचे देहू येथील जीर्ण घर व जन्मस्थान यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येणार आहे. राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांच्या विकासकामांअंतर्गत श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून मंदिर परिसराचा विकास आणि भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी देण्यात येणार आहे.

वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाययोजना
पुणे महानगरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रेल्वे, मेट्रो आणि महामार्ग प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. पुणे ते लोणावळा दरम्यान ५ हजार १०० कोटी रुपयांच्या खर्चाने तिसरी आणि चौथी रेल्वेमार्गिका उभारण्यात येणार असून या प्रकल्पाचा लाभ पिंपरी-चिंचवड, आकुर्डी आणि तळेगाव परिसराला होणार आहे.

राज्यातील मेट्रो नेटवर्क १ हजार २०० किलोमीटरपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ६ हजार किलोमीटरहून अधिक द्रुतगती मार्गांचे जाळे विकसित करण्यात येणार आहे. पुणे मेट्रोच्या टप्पा-२ अंतर्गत खडकवासला–स्वारगेट–हडपसर–खराडी मार्गावर हडपसर ते लोणी काळभोर तसेच हडपसर बस डेपो ते सासवड रोड या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. रामवाडी ते वाघोली (११ कि.मी.) मेट्रो मार्गालाही मंजुरी देण्यात आली असून येरवडा ते कात्रज आणि हिंजेवाडी ते सिंहगड रोड या ५४ कि.मी. दुहेरी भुयारी मेट्रो मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येत आहे.

तसेच पुणे ते शिरूर ५३ कि.मी. उन्नत मार्गासाठी ७ हजार ५१४ कोटी रुपये, तळेगाव–चाकण २५ कि.मी. उन्नत मार्गासाठी ६ हजार ४९९ कोटी रुपये, चाकण–शिक्रापूर २८ कि.मी. मार्गाच्या सहापदरीकरणासाठी ५ हजार २३२ कोटी रुपये, शिरूर ते छत्रपती संभाजीनगर १९२ कि.मी. ग्रीनफिल्ड महामार्गासाठी १४ हजार ८८६ कोटी रुपये, तसेच हडपसर ते यवत ३१.५० कि.मी. सहापदरीकरणासाठी ५ हजार २६२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

ग्रोथ हब, मिडिया टेक आणि एव्हीजीसी केंद्र
मुंबई महानगराच्या धर्तीवर पुण्यात ‘ग्रोथ हब’ विकसित करण्यात येणार आहे. तसेच मुंबई आणि पुणे येथे मिळून ५० अब्ज डॉलर्स क्षमतेचे मिडिया-टेक आणि एव्हीजीसी (अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग व कॉमिक्स) केंद्र उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून ३० लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून राज्यात ४०० जागतिक क्षमता केंद्रे (जीसीसी) तसेच नवउपक्रम शहरांची उभारणी करण्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा
– वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई
– पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

Talegaon Dabhade : उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून दंडात्मक कारवाईचा बडगा

Next Post

शाब्बास !! ‘यूपीएससी’चा नागरी सेवा परीक्षा 2025 चा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील साठहून अधिक उमेदवार यशस्वी – पाहा निकाल

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
UPSC Civil Services Exam 2025 results declared more than sixty candidates from Maharashtra successful see results

शाब्बास !! 'यूपीएससी'चा नागरी सेवा परीक्षा 2025 चा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील साठहून अधिक उमेदवार यशस्वी - पाहा निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Alert issued for various districts in state heavy rain accompanied by lightning forecast for next five days

राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी ; पुढील पाच दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

August 2, 2026
Live 7-12 extracts distributed to farmers in Maval citizens benefited from Shivaji Maharaj Maharajswa Camp

मावळातील ३३७१ खातेदारांना जिवंत सातबारा वाटप ; छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा ३३२९ नागरिकांनी घेतला लाभ

August 2, 2026
Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

August 1, 2026
ahilyadevi holkar karjmukti yojna Loan waivers for 2337 farmers in Maval Taluka

मावळ तालुक्यातील 2337 शेतकऱ्यांची एकूण 11 कोटी 21 लाख रूपयांची कर्जमाफी

August 1, 2026
Inauguration of Talegaon Smart City Vision 2035 workshop in-depth brainstorming on planned development

‘तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन – २०३५’ कार्यशाळेचे उद्घाटन ; चर्चासत्रात शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सखोल विचारमंथन

August 1, 2026
rain image rain alert heavy rain

पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद

July 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.