Dainik Maval News : कामशेत पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे 5 देशी बैल आणि एका गायीचा जीव वाचला आहे. मावळ तालुक्यातून बेकायदेशीररित्या ही सहाही जनावरे छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जात असताना गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे संपूर्ण प्रकार उघडकीस आले आहे. सदर बैल आणि गाय कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात होते, त्यामुळे त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले असून कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती गोरक्षक माऊली आंद्रे यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्राप्त माहितीनुसार, संतोष गोविंदराव गिले (वय 30 वर्षे रा कौटखेड ता कन्नड जिल्हा संभाजीनगर), पंढरीनाथ केरू धिडे (रा. कोळवण ता. मुळशी जि.पुणे) आणि मनोज देविदास चव्हाण (वय 29 वर्षे), रामचंद्र रामराव साळुंके (वय 60 वर्षे दोघे रा मुंडवाडी तांडा ता कन्नड जिल्हा संभाजीनगर) यांनी संगनमत करून त्यांच्या ताब्यातील टेम्पोमधून 5 बैल आणि 1 कालवड (गाई) असे एकूण 6 जनावरे दाटीवाटीने स्स्सीने बांधून त्यांना कोणत्याही प्रकारचे चारा पाण्याची सोय न करता, तसेच सदर जनावरांचे वैदयकीय अधिकारी यांचे फिटनेस प्रमाणपत्र, जनावरे वाहतूक करण्याचा परवाना नसताना ते कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असताना मिळून आल्याचे पोलिसांकडील फिर्यादीत नमूद आहे.
अधिक वाचा –
– वडगावातील मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहा आदिवासी कुटुंबीयांना जातीचे दाखले वाटप । Vadgaon Maval
– राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेच्या स्वागताची तळेगावमध्ये जय्यत तयारी ; अजित पवारांच्या उपस्थितीत साजरे होणार रक्षाबंधन