Dainik Maval News : भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन गुरूवारी संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा झाला. मावळ तालुक्यात खेडोपोडी स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळाला. देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भाजपा युवा मोर्चाचे तालुका कार्याध्यक्ष किरण जगताप आणि सरचिटणीस साहेबराव बोडके यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या मालेवाडी, धालेवाडी, निकमवाडी याठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना किरण जगताप आणि साहेबराव बोडके यांच्यावतीने शालेय गणवेश, शालेय साहित्य आणि स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. यावेळी नवीन शालेय उपयोगी वस्तू मिळाल्याने विद्यार्थी आनंदीत झाले होते.
याप्रसंगी ग्रामविकास अध्यक्ष निलेश ठाकर, उपाध्यक्ष आकाश साबळे, लक्ष्मण निंबळे, उत्तर भारतीय आघाडीचे महासचिव निशित सिंग, महिला आघाडीच्या सरचिटणीस यमुना मरगळे, अनिल साबळे, उपसरपंच राणीताई साबळे, चेरमन संदीप बोडके, ज्ञानेश्वर साबळे, भरत साबळे, प्रशांत साबळे, राहुल साबळे, अश्विनी खराडे, सारिका निकम, लक्ष्मण मरगळे, धोंडिबा मरगळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस आकाश साबळे आणि उपाध्यक्ष लक्ष्मण निंबळे यांनी केले होते.
अधिक वाचा –
– तळेगावमध्ये मतदार नोंदणी अभियान, भाजपाच्या वतीने शहरात अनेक ठिकाणी कक्ष सुरू । Talegaon Dabhade
– वडगावातील मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहा आदिवासी कुटुंबीयांना जातीचे दाखले वाटप । Vadgaon Maval
– राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेच्या स्वागताची तळेगावमध्ये जय्यत तयारी ; अजित पवारांच्या उपस्थितीत साजरे होणार रक्षाबंधन