Dainik Maval News : पवन मावळ विभागातील प्रमुख ग्रामपंचायत असलेल्या कोथुर्णे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शकुंतला काळू वाघमारे यांची अवघ्या एका मताच्या फरकाने निवड झाली आहे. कोथुर्णे ग्रामपंचायतीचे मावळते सरपंच संदीप मारुती दळवी यांनी ठरविल्याप्रमाणे पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी विशेष सभा बोलावण्यात आली. त्यात सरपंच पदासाठी दोन अर्ज आल्याने निवडणूकीची घोषणा झाली. यावेळी शकुंतला काळू वाघमारे यांना चार मते मिळाली, तर जुईली सुरेश दळवी यांना तीन मते मिळाल्याने शकुंतला वाघमारे या अघ्या एका मताने विजयी होऊन सरपंच बनल्या. ( Shakuntala Waghmare Elected Sarpanch of Kothurne Gram Panchayat Maval )
निवडणूक अधिकारी म्हणून सचिन कोकाटे तर सचिव म्हणून एस.बी. तिडके पाटील यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पल्लवी फाटक, सदस्य प्रमोद दळवी, आंबोली सोनवणे, संदीप दळवी, जुईली दळवी, रुपाली दळवी यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर गुलालाची उधळण करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
अधिक वाचा –
– कुंडमळा येथील पुलासाठी 8 कोटींचा निधी, रविंद्र भेगडे यांनी मानले मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार । Maval News
– ‘प्रत्येकीला सन्मानाची वागणूक देणाऱ्या आण्णांसोबत भगिनी म्हणून सदैव उभ्या राहू’, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा रक्षाबंधन सोहळा उत्साहात
– बदलापूर अत्याचार प्रकरणाचा मावळातील जनतेकडून तीव्र निषेध, वडगाव मावळ येथे निषेध मोर्चा आणि तहसीलदारांना निवेदन