व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेत पोलिसांची मोठी कारवाई, 98 किलो गांजासह 56 लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त, 4 जण अटकेत

संकल्प नशामुक्ती अंतर्गत लोणावळा उपविभागात पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून अंमली पदार्थ तसेच जुगार तत्सम बेकायदेशीर प्रकाराच्या विरोधात जोरदार कारवाई सुरू आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 26, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Kamshet police

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : संकल्प नशामुक्ती अंतर्गत लोणावळा उपविभागात पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून अंमली पदार्थ तसेच जुगार तत्सम बेकायदेशीर प्रकाराच्या विरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. याच अभियानाअंतर्गत कामशेत पोलिसांनी गुरुवारी धडाकेबाज कारवाई करीत 4 जणांना अटक केले, तसेच त्यांच्याकडील 98 किलो गांजासह तब्बल 56 लाख 92 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दिनांक 22 ऑगस्ट) रोजी सकाळी कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ताजे (ता. मावळ) गावचे हददीतून जुन्या हायवे वरून ताजे गावातून पुढे मळवली, लोणावळाकडे 4 व्यक्ती त्यांच्या ताब्यातील कारमधून गांजांची वाहतूक करणार आहे. पाटील यांनी वरीष्ठांना मिळालेल्या बातमीचा आशय सांगून उपविभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा विभाग सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे दोन पथके तयार करून पंचांच्या उपस्थितीमध्ये सापळा लावला. ( big operation by Kamshet police 98 kg of ganja and worth 56 lakh were seized 4 people arrested )

मिळालेल्या बातमीप्रमाणे एक वेरना कार (क्र.एम.एच/14/जी.वाय/0550) हि जुन्या हायवे मार्गे ताजे गावाकडे आलेली दिसली. त्यावेळी कारवाईसाठी तयार पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निरीक्षक रविंद्र पाटील यांनी दिले सुचने प्रमाणे छापा घालून कारची व डिकीची पाहणी केली असता गाडीच्या डिकीमध्ये एकूण 98 किलो वजनाचा गांजा हा आंमलीपदार्थ मिळून आला.

पोलिसांनी कारमधील अभिषेक अनिल नागवडे (वय 24), प्रदिप नारायण नामदास (वय 25 वर्षे), योगेश रमेश लगड (वय 32 वर्षे) व वैभव संजीव चेडे (वय 23 वर्षे, सर्व रा.पी.एम.टी. स्टॉप जवळील, मराठी शाळे जवळ, कारेगांव, ता. शिरूर, जि.पुणे) यांना अटक केली आहे. त्यांच्या जवळ एकुण 48 लाख 50 हजार रुपये किंमतीचा 98 किलो वजनाचा गांजा, 8 लाख रूपये किंमतीची वेरना कार आणि 42 हजार रूपये किंमतीचे 3 मोबाईल हँडसेट असे एकूण 56 लाख 92 हजार रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. वरील चारही आरोपींच्या विरोधात कामशेत पोलीस स्टेशनला गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन 1985 चे कलम 8 (क) 20 (क) अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो. नि. रविंद्र पाटील हे करीत आहेत.

कामशेत पोलिसांनी केलेल्या सदरच्या कारवाईमध्ये पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील, तसेच पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहा. फौजदार नितेश कदम, पोलीस अंमलदर. रविंद्र रावळ, जितेंद्र दिक्षित, समिर करे, रविंद्र राय, गणेश तावरे, प्रतिक काळे, गणेश ठाकुर, शिवाजी टकले, सचिन निंबाळकर, पवन डोईफोडे, राजू कोळी, होमगार्ड सुशिल लोखंडे, रामदास पोटफोडे यांनी सहभाग घेतला होता.

अधिक वाचा –
– शिरगाव येथील तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत पवना शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांना घवघवीत यश । Pavananagar News
– कुंडमळा येथील पुलासाठी 8 कोटींचा निधी, रविंद्र भेगडे यांनी मानले मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार । Maval News
– ‘प्रत्येकीला सन्मानाची वागणूक देणाऱ्या आण्णांसोबत भगिनी म्हणून सदैव उभ्या राहू’, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा रक्षाबंधन सोहळा उत्साहात


dainik maval jahirat

Previous Post

भर पावसात उधळला गुलाल, कोथुर्णे ग्रामपंचायत सरपंचपदी शंकुतला वाघमारे, अवघ्या 1 मताने मारली बाजी । Gram Panchayat Election

Next Post

मोठी बातमी ! पवनमावळात अतिमुसळधार पाऊस, पवना धरण 99 टक्के भरले, 1400 क्युसेक विसर्ग सुरू

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pavana dam

मोठी बातमी ! पवनमावळात अतिमुसळधार पाऊस, पवना धरण 99 टक्के भरले, 1400 क्युसेक विसर्ग सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.