Dainik Maval News : पवना धरणातून 1400 क्युसेक विसर्ग सुरू असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्यातील प्रमुख पवना धरण हे आजमितिस (दि. 24 ऑगस्ट) 99 टक्के इतके भरले असून, धरण पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पुढील काही तासांमध्ये धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर धरण विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
काय आहे सुचना?
पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे, की पवना धरण सद्यस्थितीत 99 टक्के भरलेले असून पाणलोट क्षेत्रात पावसास सुरुवात झालेली आहे. धरणात येणारा येवा विचारात घेता लवकरच पाणीसाठा 100 टक्के होण्याची दाट शक्यता आहे. सद्यस्थितीत धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता जलविद्युत केंद्रामधून विदुयतगृहाद्वारे 1400 क्युसेक्स इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग चालू असून पाणलोट क्षेत्रात होणा-या पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार सांडव्याद्वारे विसर्ग सोडण्यात येणार आहे.
तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे की, नदीपात्रात कोणीही उतरू नये. नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील सर्व नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास/प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– शिरगाव येथील तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत पवना शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांना घवघवीत यश । Pavananagar News
– कुंडमळा येथील पुलासाठी 8 कोटींचा निधी, रविंद्र भेगडे यांनी मानले मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार । Maval News
– ‘प्रत्येकीला सन्मानाची वागणूक देणाऱ्या आण्णांसोबत भगिनी म्हणून सदैव उभ्या राहू’, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा रक्षाबंधन सोहळा उत्साहात