व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणखीन दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा ; जिल्हा परिषदेचा एक गट आणि पंचायत समितीच्या एका गणातील उमेदवार जाहीर

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाने चांदखेड पंचायत समिती गणातून सुनिता मनोज येवले, टाकवे बुद्रुक पंचायत समिती गणातून प्राची देवाभाऊ गायकवाड आणि खडकाळा-कार्ला जिल्हा परिषद गटातून दिपाली दीपक हुलावळे यांना उमेदवारी जाहीर केली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 15, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
NCP party announces first list for Talegaon Dabhade Municipal Council Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मंगळवार (दिनांक 13 जानेवारी) रोजी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा केल्यानंतर निवडणुका जाहीर झालेल्या ठिकाणी राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली असून पंचायत समिती मावळची देखील निवडणूक जाहीर झालेली आहे. या अनुषंगाने मावळात देखील राजकीय घडामोडी वेगाने घडत असून राजकीय पक्षांच्या बैठकांचे सत्र सुरू झालेले आहे.

मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण पाच गट आहेत, तर पंचायत समितीचे एकूण दहा गण आहेत. आजपर्यंत वेगवेगळ्या वेळी, ठिकाणी मावळ तालुक्यातील काही राजकीय पक्षांकडून आपल्या पक्षांच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यानुसार आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाने तीन उमेदवार जाहीर केले होते, तर भारतीय जनता पार्टी पक्षाने दोन आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) व शिवसेना उबाठा यांच्याकडून प्रत्येकी एक असे सात उमेदवार जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आज, बुधवार (दिनांक 14 जानेवारी) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून आणखीन दोन उमेदवार अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेले आहे.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाने चांदखेड पंचायत समिती गणातून सुनिता मनोज येवले, टाकवे बुद्रुक पंचायत समिती गणातून प्राची देवाभाऊ गायकवाड आणि खडकाळा-कार्ला जिल्हा परिषद गटातून दिपाली दीपक हुलावळे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सोमाटणे पंचायत समिती गण आणि सोमाटणे जिल्हा परिषद गट मधील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

सोमाटणे पंचायत समितीचा गण नागरिकांचा मागास प्रवर्ग याकरिता आरक्षित असून येथून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे नेते साहेबराव कारके यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर सोमाटणे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित असून या जिल्हा परिषद गटातून मनीषा नितीन मुऱ्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी याबाबत माहिती दिली असून राष्ट्रवादीचे आतापर्यंत पाच उमेदवार जाहीर झालेले दिसून येतात. यापैकी चांदखेड सोमाटणे जिल्हा परिषद गट यातील जिल्हा परिषदेचा उमेदवार आणि पंचायत समितीच्या दोन्ही गणातील उमेदवार जाहीर झाले असून लवकरच पक्षाकडून उर्वरित जिल्हा परिषद गटातील आणि गणातील उमेदवार जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा –
– प्रत्येक मतदार दोन मते देणार, ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्रे, उमेदवारांना खर्चाची मर्यादा ; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीबाबत ‘ही’ माहिती नक्की वाचा

– Lonavala : राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या लोणावळा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाचे देविदास कडू यांची बिनविरोध निवड

– या कचऱ्याचा वाली कोण? वडगावच्या वेशीत तळेगावचा कचरा? वडगाव नगरपंचायतीच्या संबंधित यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर


Previous Post

जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणूक 2026 : मावळ तालुक्यात आतापर्यंत ‘या’ 7 उमेदवारांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर

Next Post

Maval Crime : ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हे दाखल, सोमाटणे येथील प्रकार ; तळेगाव दाभाडे पोलिसांची कारवाई

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

Maval Crime : ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हे दाखल, सोमाटणे येथील प्रकार ; तळेगाव दाभाडे पोलिसांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Elderly woman seriously injured in bee attack in Talegaon Dabhade

तळेगावमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात ज्येष्ठ महिला गंभीर जखमी

May 4, 2026
drowning

लोणावळ्यातील बेपत्ता ‘यश’चा वलवण धरणात बुडून मृत्यू

May 4, 2026
Do not wait at Mumbai Pune missing link for photos MSRDC appeals to vehicle owners

सेल्फी, फोटो, रिल काढण्यासाठी थांबू नका, नाहीतर मोठ्या दंडाची आकारणी होऊ शकते ! मिसिंग लिंक बाबत महत्वाची अपडेट

May 4, 2026
Nasrapur case Trial will be conducted in fast track court said Deputy Chief Minister Sunetra Pawar

नसरापूर प्रकरण : फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवणार ; आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

May 3, 2026
Crime

तीन वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून खून ; बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेला अल्पवयीन आरोपी ताब्यात

May 3, 2026
SSC-HSC-Exam-Result

सविस्तर निकाल : इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर । Maharashtra HSC Board Results 2026

May 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.