Dainik Maval News : मावळ भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी लोणावळा शहर आणि परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन गणरायाची आरती केली. तसेच गणेशोत्सव मंडळातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी तालुक्यात सध्या गाजत असलेले ‘आप्पा.. यंदा माघार नाही’ हे गीत वाजवत कार्यकर्त्यांनी रविंद्र भेगडे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘रविंद्र आप्पा, तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ है’ या घोषणांनी मंडळांचे परिसर दणादूण गेले होते. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रविंद्र भेगडे यांनी गणेश मंडळ दर्शन भेटीच्या निमित्ताने केलेल्या शक्ती प्रदर्शनाने भेगडे विधानसभेला थांबणार नसल्याची चर्चा रंगली आहे.
- रविंद्र भेगडे यांनी घेतलेल्या दर्शनपर भेटीमध्ये लोणावळा शहरातील पहिला मानाचा गणपती श्री रायवूड गणेश मंडळ, तरुण मराठा मंडळ गावठाण, ओंकार तरुण मंडळ तुंगार्ली, शेतकरी भजनी मंडळ वळवण, जय महाराष्ट्र गजानन मित्र मंडळ, श्री राणा प्रताप नेताजी मित्र मंडळ, श्री तुफान मित्र मंडळ गावठाण, श्री संत रोहिदास तरुण मंडळ, महाराष्ट्र मातंग समाज मंडळ, श्री साईनाथ मित्र मंडळ, श्रीमंत नेहरू मित्र मंडळ, अखिल भाजी व फळ मार्केट गणेशोत्सव मंडळ, श्री नवयुग महाराष्ट्र मित्र मंडळ, नटराज मित्र मंडळ लोणावळा, इंद्रायणी नगर गणेशोत्सव मंडळ, श्री शिवाजी मित्र मंडळ या मंडळांना भेटी दिल्या.
यावेळी त्यांच्या समवेत लोणावळा नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, गुलाबराव म्हाळसकर, अरुण लाड, अमोल शेटे, संभाजी म्हाळसकर, सचिन येवले, अमोल धिडे, शुभम मानकामे, अमोल भेगडे, शेखर दळवी, अभिजीत नाटक, प्रनेश नेवाळे, प्रथमेश पालेकर, सागर येवले, रुपेश येवले यांसह भारतीय जनता पार्टी लोणावळा शहरातील आणि रविंद्र आप्पा भेगडे युवा मंचाचे अनेक सहकारी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– वडगाव मावळ येथील बाल संरक्षण शिक्षण परिषदेला 300 शिक्षकांची उपस्थिती । Maval News
– आमदार सुनिल शेळके यांनी घेतले दगडूशेठ गणपती आणि लालबागचा राजाचे दर्शन । MLA Sunil Shelke
– वडगाव मावळ येथील प्रसिद्ध व्याख्याते विवेक गुरव यांना राज्यस्तरीय संवादरत्न पुरस्कार । Vadgaon Maval