Dainik Maval News : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे हे सातवे वर्ष असून गुरुवार (दि 19 सप्टेंबर) रोजी शिबिराची सुरुवात झाली. शिबिराच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कान्हे येथील नवीन उपजिल्हा रुग्णालयात हे शिबिर सुरु असून दिनांक 28 सप्टेंबर पर्यंत हे शिबिर असणार आहे. माय माऊली ज्येष्ठ नागरिक संघ मावळ, श्री विठ्ठल परिवार मावळ, कुलस्वामिनी महिला मंच मावळ या संस्थां शिबिराचे संयोजन करत आहेत.
“महाआरोग्य शिबिराच्या पहिल्या दिवशी सर्वांचा उदंड प्रतिसाद लाभला. आपल्या सर्वांच्या आरोग्यसेवेसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध असेल. आपल्या आरोग्याच्या समस्या सोडिवण्याला माझे प्राधान्य आहे आणि यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. शिक्षण,आरोग्य आणि विकासाच्या क्षेत्रात आपण एकत्र मिळून अनेक उपक्रम राबविले आहेत. प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे आणि यासाठीच हा उपक्रम सातत्याने आपण दरवर्षी राबवित आहे.” असे आमदार सुनिल शेळके यांनी सांगितले.
शुक्रवारी सोमाटणे, बेबेड ओहोळ, चांदखेड परिसरातील नागरिकांसाठी शिबिर –
शुक्रवार, दिनांक 20 सप्टेंबर रोजी सोमाटणे, शिरगाव, गहुंजे, साळुंब्रे, गोडुंब्रे, सांगवडे, दारूंब्रे, कुसगाव, पाचाणे, पुसाणे, दिवड, ओवळे, डोणे, आढले बु., आढले खु., चांदखेड, देवगड, बेबडओहोळ, परंदवडी, धामणे, पिंपळखुटे, शिवणे, मळवंडी ढोरे, थुगाव, आर्डव या गावांतील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे.
अधिक वाचा –
– मावळमधील कलाशिक्षक अतिश थोरात यांचा जागतिक विक्रम ; इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद । Maval News
– विजयकुमार सरनाईक यांनी स्विकारला तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार । Talegaon Dabhade
– द्रुतगती मार्गावरील नवीन बोगद्यात एसटी बसचा अपघात, 6 जण जखमी । Lonavala News