Dainik Maval News : राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ भोसरी येथील 19 वर्षाखालील क्रिकेट संघाने परंडवाल ओपन संघाविरुद्ध सराव सामन्यात प्रभावी विजय मिळवला. या सामन्याचे आयोजन परंदडवाल क्रिकेट अकादमी, देहू येथे करण्यात आले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
राजमाता जिजाऊ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चैतन्य कोंडभर याच्या 113 चेंडूत 85 धावांच्या संयमी खेळीच्या जोरावर 42.1 षटकात सर्व बाद 175 धावा केल्या. गणेश काळेलने 21 चेंडूत 27 धावांची महत्त्वाची साथ दिली. प्रत्युतरात, परंडवाल ओपन संघाने धावांचा पाठलाग करताना सुमित केंगार ने 27 चेंडूत 45 धावांचे योगदान दिले, परंतु त्याला दुसऱ्या बाजूने योग्य साथ मिळाली नाही.
त्यामुळे संघ 22.1 षटकात सर्व बाद 132 धावांवर आटोपला, ज्यामुळे राजमाता जिजाऊ संघाला 43 धावांनी विजय मिळाला. या विजयात प्रीतम सूर्यवंशीने 4.1 षटकात 17 धावा देत 5 बळी घेतले. संघाला प्रशिक्षक दत्तात्रय वाळके सर व गोपीचंद कारंडे सरांचे मार्गदर्शन लाभले, ज्यामुळे त्यांच्या कामगिरीत वाढ झाली.
अधिक वाचा –
– भात पिकावर करपा, कडा करपा आणि शेंडे करपा रोगाची लागण ; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन । Maval News
– मावळमधील कलाशिक्षक अतिश थोरात यांचा जागतिक विक्रम ; इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद । Maval News
– विजयकुमार सरनाईक यांनी स्विकारला तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार । Talegaon Dabhade