Dainik Maval News : पोलीस असल्याची बतावणी करीत नकली ओळखपत्र दाखवून एका 67 वर्षीय व्यक्तीचे सुमारे पावणेदोन लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. लोणावळ्यातील सर्वात वर्दळीच्या जयचंद चौक याठिकाणी ही घटना घडली. याप्रकरणी हनीफ कादर खान (वय 67, रा. हुडको कॉलनी, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
हनीफ खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे फेरी मारता असताना जयचंद चौकातील अनिल स्टोअर्सजवळ त्यांच्याकडे काळ्या रंगाचे जॅकेट, काळी जिन्स पँट व डोक्यावर हेल्मेट परिधान केलेली एक अनोळखी व्यक्ती आली. खान यांना थांबवत आपण पोलिस असून दोन आरोपींना आम्ही अटक केली असून त्यांच्याकडे रोख रक्कम आणि पिस्तूल सापडले आहे. तुमच्याकडे काय आहे असे म्हणत हनीफ खान यांची झडती घेतली.
यावेळी खान यांच्याकडील सोन्याचे दीड तोळा वजनाचे ब्रेसलेट, दीड तोळा वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या काढून घेत रुमालात ठेवा असे सांगितले. दागिने काढून रुमाल ठेवत असताना सदर तरुणाने हातचलाखी करून काढून घेत सुमारे 1 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज ल॑पास करत पोबारा केला. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी भर चौकात हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद । Maval News
– भात पिकावर करपा, कडा करपा आणि शेंडे करपा रोगाची लागण ; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन । Maval News
– मावळमधील कलाशिक्षक अतिश थोरात यांचा जागतिक विक्रम ; इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद । Maval News