Dainik Maval News : मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी 2024 विधानसभा निवडणूकीत 1 लाख 25 हजारपेक्षा जास्तीचे मताधिक्य मिळणार असल्याचा दावा केला आहे, आमदार शेळके यांच्या या दाव्यामुळे त्यांच्या विरोधकांचे धाबे दणणाले आहे. शुक्रवारी (दि.20) एका खासगी माध्यम संस्थेला दिलेल्या प्रकट मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी 2019 पेक्षा 2024 च्या विधानसभा निवडणूकीत मताधिक्य वाढणार असल्याचे सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
काय म्हटले आमदार सुनिल शेळके?
यंदा विधानसभेला तिकिट मिळाल्यास मताधिक्याची खात्री किती असेल आणि गतवेळीपेक्षा मताधिक्य वाढेल की कमी होईल, असा प्रश्न प्रतिनिधीने आमदार सुनिल शेळके यांना विचारला. त्यावर आमदार सुनिल शेळके यांनी, मावळची जनता विकासकामे पाहतेय. विकासाला महत्व देत आहे. मागील चार वर्षांतील कामे जनतेसमोर आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की विधानसभेला 1 लाख 25 हजारपेक्षा जास्तीचे बहुमत मिळेल, असा विश्वास आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केला. ( MLA Sunil Shelke confident of getting more than 1 lakh 25 thousand votes in 2024 assembly elections )
लवकरच कार्य अहवालाचे प्रकाशन
आमदार सुनिल शेळके यांनी या मुलाखतीत आपण तालुक्यात 2900 कोटींची कामे शासकीय निधीतून केल्याचे सांगितले. त्यासह विविध संस्था, एनजीओ, कंपन्या, दानशूर व्यक्ती यांनीही मदत केली. या पैशातून केलेल्या पै अन् पै चा हिशोब आणि विकासकामांची गावनिहाय माहिती असलेल्या कार्यअहवालाचे लवकरच प्रकाशन होणार आहे. 4 ऑक्टोबरला तालुक्यात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पणाचा कार्यक्रम आहे, त्यावेळी ह्या कार्यअहवालाचे प्रकाशन करणार असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद । Maval News
– भात पिकावर करपा, कडा करपा आणि शेंडे करपा रोगाची लागण ; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन । Maval News
– मावळमधील कलाशिक्षक अतिश थोरात यांचा जागतिक विक्रम ; इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद । Maval News