Dainik Maval News : वडगाव मावळ येथील मावळ विचार मंच च्या माध्यमातून यावर्षी देखील सरस्वती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. सरस्वती व्याख्यानमालेच्या निमित्ताने वडगाव मावळ सारख्या ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, वैचारिक वक्तृत्व ऐकण्याची संधी लाभत आहे. ही वैचारिक परंपरा अखंडित ठेवण्यासाठी सरस्वती व्याख्यानमाला 2024 च्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांची कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
गुरुवार, दिनांक 3 ऑक्टोबर ते शुक्रवार, दिनांक 11 ऑक्टोबर 2024 या दरम्यान ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात ही व्याख्यानमाला दररोज सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित करण्यात आली आहे. मावळ विचार मंचची स्थापना 2000 साली झाली असून यंदा सरस्वती व्याख्यानमालेचे हे 24 वे वर्ष आहे. आजवर राज्य पातळीवर अनेक नामवंत वक्त्यांनी व्याख्यानमालेत हजेरी लावली आहे.
संपूर्ण कार्यकारिणी : गुलाबराव म्हाळसकर (अध्यक्ष), पुजा प्रसाद पिंगळे (कार्याध्यक्ष), भक्ती सागर जाधव (कार्यक्रम प्रमुख)
यासह, मावळ विचार मंच चे भास्करराव म्हाळसकर (संस्थापक अध्यक्ष), डॉ. रविंद्र आचार्य (कार्याध्यक्ष), डॉ. सुनिल बाफना (उपाध्यक्ष), अशोक चव्हाण (सचिव), नेमीचंद गुजराणी (कोषाध्यक्ष), म.मं. शिरोडकर (अधीक्षक/संचालक), राजेंद्र लचके (संचालक), बाळासाहेब बोरवके (निमंत्रित सदस्य), जयंत दमगम (निमंत्रित सदस्य) यांचेही सहकार्य असणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन । Pune News
– आता ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे एकच पद ; ग्रामपंचायतींना 15 लाखांपर्यंतची विकासकामे करण्याचा अधिकार
– पीएमआरडीएच्या 3 हजार 838 कोटी 61 लाखांच्या अर्थसंकल्पास मंजुरी । PMRDA