Dainik Maval News : वडगाव मावळ शहरातील मुख्य बाजारपेठेतील प्रस्तावित रस्ता रुंदीकरण करण्याच्या विरोधात बाजारपेठेतील व्यावसायिकांनी गुरुवारी (दि.26) मोर्चा काढून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांना मागण्यांचे निवेदन दिले. तसेच मागणीच्या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार, खासदार आदींना पाठविली आहे.
वडगांव शहरातील मुख्य रस्ता 9 मीटर करावा, याबाबत वडगांव कृती समिती ने निवेदन दिले. ‘प्रस्तावित डीपी मध्ये (DP) वडगांव बाजारपेठ लगत असलेला रस्ता हॉटेल अक्षय पॅलेस ते श्रीमंत महादजी शिंदे उद्यान यामधील हा रस्ता 15 आणि 18 मीटर असा दोन प्रकारात दाखविलेला आहे. वास्तविक पाहता हा रस्ता 9 मीटर असणेच गरजेचे आहे. वडगांव शहराला बाहेरून 4 पदरी महामार्ग आणि सेवा रस्ता उपलब्ध आहे. वडगांव शहरातून एकही सार्वजनिक सेवेचे वाहन जात नाही.’ असे निवेदनात लिहिले आहे.
यासोबत, ‘संपूर्ण वडगांव मध्ये ही एकमेव बाजारपेठ आहे. ज्यामुळे अनेक व्यापारी बांधवांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. गेल्या वर्षी याच रस्त्याचे रुंदीकरण आणि नूतनीकरण झालेले आहे. वाहतुकीचे इतर अनेक पर्याय देखील उपलब्ध असताना आणि गरज नसतांना हा रस्ता प्रस्तावित 15 मीटर अथवा 18 मीटर न करता 9 मीटर असावा.’ अशी विनंती व्यावसायिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
वडगाव शहरातील व्यापारी, सामान्य नागरिक, सर्व पक्षीय पदाधिकारी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. मुख्याधिकारी डॅा प्रवीण निकम यांच्या बरोबर याविषयी सकारात्मक चर्चा करण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन, पाहा वेबसाईट । Pune News
– संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन । Pune News
– आता ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे एकच पद ; ग्रामपंचायतींना 15 लाखांपर्यंतची विकासकामे करण्याचा अधिकार