Dainik Maval News: रानडुक्कराची शिकार करून मांस वाहतूक करणाऱ्या पाच जणांना वडगाव मावळ वन विभागाने अटक केली आहे. रानडुकराचे मांस आणि कार असा एकूण सहा लाखांचा ऐवज जप्त केला आहे. वडगाव मावळ वनविभागाने गुरुवारी (दि. 26) वडगाव येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर ही कारवाई केली. मारुती शितोळे, सत्यवान भोईर, दत्ता वाघमारे, संजय वाघमारे, सीताराम जाधव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, जुना पुणे-मुंबई महामार्गावर एक स्कॉर्पिओ गाडीत रानडुक्कर या वन्यप्राण्याचे मांस अवैधरित्या शिकार करून वाहतूक करत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानंतर वन विभागाने कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रानडुकराचे मांस, स्कॉर्पिओ गाडी असा एकूण सहा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. तसेच त्यांच्या विरोधात भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये वन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ एस डी वरक, वन परिमंडळ अधिकारी मल्लिनाथ हिरेमठ, वनपाल देवले दया डोमे, वनरक्षक परमेश्वर कासुळे, वनरक्षक योगेश कोकाटे, वनरक्षक एस. के. मोरे, वनरक्षक कृष्णा देठे, वनरक्षक दीपक उबाळे व वनसेवक जांभूळकर यांच्या पथकाने केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘शिवदुर्ग मित्र’चे संस्थापक अध्यक्ष सुनिल गायकवाड यांना पितृशोक
– कान्हे येथील महाआरोग्य शिबिराचा शनिवारी शेवटचा दिवस, आतापर्यंत 40 हजाराहून अधिक मावळवासियांनी घेतला लाभ
– पावसाने मोडला रेकॉर्ड : लोणावळ्यात यंदा 5822 मिमी पाऊस, गेल्या 24 तासात तब्बल 155 मीमी पाऊस । Lonavala Rain