Dainik Maval News : मावळ तालुक्यातील सोमाटणे गावचे सुपुत्र डॉ. पद्मवीर भगवानराव थोरात यांची महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट अ पदी नुकतीच निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य आयबीपीएस मंडळाद्वारे ही परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेत प्राविण्य मिळवत डॉ थोरात यांनी हे यश मिळविले आहे.
निवडीनंतर डॉ. थोरात यांना पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून पोस्टिंग देण्यात आली आहे. थोरात यांच्या निवडी नंतर सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून संघर्ष करून डॉ.पद्मवीर थोरात यांनी हे यश मिळविले आहे.
डॉ. थोरात यांनी बीएएमएस, एमडी आयुर्वेद, एमबीए शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा सोमाटणे गाव येथे, तर माध्यमिक शिक्षण श्री तुळजाभवानी विद्यालय सोमाटणे, उच्चमाध्यमिक शिक्षण वाडिया कॉलेज पुणे येथे तर वैद्यकीय पदवी पदव्युत्तर पदवी शिक्षण डॉ.डी वाय पाटील कॉलेज पिंपरी येथे झाले आहे.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सध्या ते एप्रिल २०१३ पासून ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ कान्हे येथे आरबीएसके कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मावळसाठी 44 कोटींचा निधी ; पूर, दरड प्रतिबंधक उपयोजना होणार
– युनेस्कोच्या पथकाची लोहगड किल्ल्याला भेट, स्थानिक ग्रामस्थ व अधिकाऱ्यांशी साधला संवाद । Lohgad Fort
– वंदन दुर्गांना । पोरक्या कुटुंबाला सावरण्यासाठी ती बनली वाहक, ‘पीएमपी’च्या आदर्श ‘कंडक्टर’ आरतीताई । Aarti Shinde