Dainik Maval News : पवन मावळ विभागातील किल्ले तुंग गडावर मशाल महोत्सवातून तुंगाई देवीचा जागर करण्यात आला. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, मावळ विभागाच्या वतीने नवरात्रीच्या पहिल्या माळेला हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मावळ तालुक्यासह राज्यभरातून शिवभक्त उपस्थित झाले होते.
मशाल महोत्सवाचे हे पाचवे वर्षे असून महोत्सवाला मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. पावसाळ्याचे चार महिने गड किल्ल्यांचे सेवक हे गडकिल्ल्यांवर संवर्धन कार्य करणे थांबवित असतात. कारण पावसात किल्ल्यांवर काम करणे अनेकदा धोकादायक ठरते. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर नवरात्रीच्या पहिल्या माळेला आपण देवी तुंगाईची पूजा अर्चा करून देवीला साकडं घालून आणि मशाल महोत्सव करून संवर्धन कार्याला सुरुवात करणार आहोत, असे योगेश सोनवणे म्हणाले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आता सोडणार नाही रे मौका, रवि आप्पाचा वादा पक्का – गीत लॉन्च करत विधानसभा लढविण्याचा निर्धार
– ‘मातोश्री’वरून ठाकरे कुटुंबाकडून एकवीरा देवीसाठी साडी-चोळीची ओटी । Ekvira Devi
– मोठी बातमी ! राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मावळसाठी 44 कोटींचा निधी ; पूर, दरड प्रतिबंधक उपयोजना होणार