Dainik Maval News : चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांचे वाईन शॉपचे लायसन्स ट्रान्सफर करून नावावर करून देण्याच्या बहाण्याने एका महिलेची 40 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 1 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडला. याप्रकरणी 56 वर्षीय महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार विनायक शंकर रामगुडे, पराग शंकर रामगुडे आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांची मंत्रालयात ओळख असल्याचे फिर्यादी यांना भासवले. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असून तिथल्या लोकांनी घेतलेले वाईन शॉपचे लायसन्स ट्रान्सफर करून फिर्यादी महिलेच्या नावावर करून देण्याच्या बहाण्याने महिलेकडून 40 लाख रुपये घेतले.
त्यानंतर त्यांना लायसन्स न देता त्यांना रक्कम परत करण्यासाठी न वटणारे धनादेश दिले. तसेच सातारा येथील एका सदनिकेची खोटी विसार पावती लिहून दिली. लायसन्ससाठी पैसे घेऊन ते परत न करता तसेच लायसन्स न देता फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आई माऊलीचा उदो उदो… कार्ला गडावर गर्दीचा उच्चांक, एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा महापूर । Karla News
– अभिनंदन ! मावळचे सुपुत्र डॉ. पद्मवीर थोरात यांची वैद्यकीय अधिकारी ‘गट अ’ पदी निवड । Maval News
– आता सोडणार नाही रे मौका, रवि आप्पाचा वादा पक्का – गीत लॉन्च करत विधानसभा लढविण्याचा निर्धार