Dainik Maval News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी (दि.8) सकाळच्या सुमारास तीन वेगवेगळे अपघात घडले. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये सुदैवाने कोणीही दगावले नसले तरीही अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे सर्व अपघात घडले आहेत.
सकाळच्या सुमारास एका मागोमाग एक झालेल्या या अपघातांमध्ये आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट, लोकमान्य हॉस्पिटलची ॲम्बुलन्स सेवा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेकडून अपघातात मदतकार्य करण्यात आले. यंत्रणांनी तातडीने मदत कार्य करून अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. खोपोली स्टेशनच्या हद्दीत हे अपघात घडले आहेत. त्यामुळे खोपोली पोलीस स्टेशनच्या टीमने घटनास्थळी दाखल होऊन अपघातांची नोंद केली आहे.
अपघात क्रमांक – 1
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई लेनवर (किमी 38.500) मंगळवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. ट्रक (क्र. HR 55 AF 2439) वरील चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक अतिवेगाने चालविल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रकने समोरील कंटेनरला (क्र. MH 04 LY 8812) पाठीमागून धडक दिली. अपघातामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी होऊन ट्रकच्या केबिनमध्ये अडला होता. देवदूत टीमच्या मदतीने त्याला केबिन बाहेर काढून उपचाराकरीता एमजीएम रुग्णालयात पाठविण्यात आले.
अपघात क्रमांक – 2
पहिला अपघात झाल्याच्या अर्ध्या तासानंतर द्रुतगती मार्गावर सकाळी पाऊणे नऊ वाजताच्या सुमारास मुंबई लेनवर (किमी 39.500) आणखीन एक अपघात घडला. कंटेनर (क्र. MH 43 Y 1154) वरील चालकाचे कंटेनर वरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील वाहनास (क्र. MH 12 MY 3234) पाठीमागून ठोकर दिली. या अपघातामध्ये कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला.
अपघात क्रमांक – 3
वरील दोन्ही अपघातातील वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करीत असतानाच साडेनऊच्या सुमारास द्रुतगती मार्गावरील मुंबई लेनवर (किमी 39.700) येथे कंटेनरचा (क्र. HP 39 UG 1132) ब्रेक फेल झाल्याने चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटून अपघात घडला. कंटेनरने समोरील कारला (क्र. KA 22 AA 3577) धडक दिली. यामुळे कारची त्यापुढील पिकअप (क्र HR 55 AS 7223) वाहनाला ठोकर लागून अपघात झाला. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही, मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– नायगावमधील ‘त्या’ जोडप्याच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत कार चालक युवकाला तळेगावमधून अटक । Kamshet News
– सदापुर गावातील युवा कार्यकर्त्यांचा आमदार शेळकेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश । Maval News
– लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे