Dainik Maval News : वडगाव मावळ येथे आज बुधवार पासून (दिनांक 16 ऑक्टोबर) ते शुक्रवार पर्यंत (दिनांक 18 ऑक्टोबर) या तीन दिवसांमध्ये तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान व समस्थ ग्रामस्थ आणि देणगीदार यांच्या सहकार्याने उभारलेल्या श्री दत्त मंदिर जीर्णोद्धार, मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा होणार आहे. करवीर पीठ कोल्हापूर चे जगद्गुरू विद्यानृसिंह भारती शंकराचार्य व महासंसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांचे हस्ते संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य वारकरी पंथाचे प्रमुख हभप वैराग्यमूर्ती मारुती बाबा महाराज कुऱ्हेकर, भागवताचार्य गुलाब महाराज खालकर आणि हभप शंकर महाराज मराठे हे आशीर्वाद देणेसाठी तसेच माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे आणि आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा संपूर्ण तीन दिवसीय कार्यक्रम संपन्न होत असताना तालुक्यातील अनेक मान्यवर व वारकरी मंडळ यावेळी उपस्थित राहणार आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे ;
बुधवार दिनांक 16 रोजी सकाळी 9 ते 12 श्री दत्त महाराज मूर्ती ग्रामदिंडी प्रदक्षिणासाठी आळंदी येथील वारकरी भजन येणार असून संपूर्ण गावातून दिंडी प्रदक्षिणा होणार असून नंतर महाप्रसाद,
गुरुवार दिनांक 17 रोजी संपूर्ण दिवसभर श्री दत्त मंदिर मध्ये होमहवन, पूजा व दुपारी महाप्रसाद
शुक्रवार दिनांक 18 रोजी प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा हा प्रमुख अतिथी महाराज व मान्यवर यांचे हस्ते सकाळी 10 वाजता संपन्न होणार. दुपारी महाप्रसाद व सांगता समारंभ मावळ भुषण ह भ प तुषार महाराज दळवी यांचे सायंकाळी 6 ते 8 कीर्तन व नंतर महाप्रसाद असे नियोजन आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ग्रामपंचायत आंबी अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न । Maval News
– संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२२-२३ अंतर्गत विभागस्तरीय निकाल जाहीर, पाहा विजेत्या गावांची यादी
– टाकवे गावात होणार भव्य मारुती मंदिर, दसऱ्याच्या मुहूर्तावर आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते भूमिपूजन । MLA Sunil Shelke

 
			






