व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 1, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बापूसाहेब.. निर्णय घेऊ नाही, निर्णय घ्या ! विधानसभा लढवायचीये नाही, विधानसभा लढवाच ! काय आहे मावळात चर्चा? नक्की वाचा

तन - मन आणि प्रत्येक क्षण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी वेचलेला मावळातील राष्ट्रवादीचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि जबाबदार पदाधिकारी म्हणून बापूसाहेब भेगडे यांचे नाव आदराने घेतले जाते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 17, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Bapu-Bhegde

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तन – मन आणि आजपर्यंतचा प्रत्येक क्षण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी वेचलेला मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि जबाबदार पदाधिकारी म्हणून बापूसाहेब भेगडे यांचे नाव घेतले जाते. चार पाच नाही, तब्बल तीस वर्षे बापूसाहेब जयवंतराव भेगडे अर्थात कार्यकर्त्यांचे लाडके बापू आण्णा भेगडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम मावळ तालुक्यात करतायेत. त्यामुळे बापूसाहेबांवर प्रेम करणारे आणि त्यांचे खंदे समर्थक असणारे कार्यकर्ते बापूसाहेबांना एकदा तरी मावळ विधानसभेचे आमदार म्हणून विधानभवनाची पायरी चढताना पाहू इच्छितात. 2009 साली बापूसाहेबांना ती डेअरिंग केली होती, मात्र काही एक हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. मात्र त्यानंतरही ते पक्षात काम करत राहिले. 2019 साली त्यांचे तिकीट वगळून ते नव्याने पक्षात आलेले आणि तालुक्यात ज्यांची लाट होती, त्या सुनिल शेळके यांना दिले आणि 25 वर्षांचा भाजपाचा बालेकिल्ला उध्वस्त करीत सुनिल शेळके यांच्या रुपाने राष्ट्रवादीचा काँग्रेस पक्षाचा पहिला आमदार झाला.

nakshtra ads may 2025

2019 नंतर तालुक्यात आमदार स्वपक्षाचा झाल्याने राष्ट्रवादीला चांगले दिवस आले. गावागावात संघटना मजबूत होत राहिली. सुनिल शेळके आमदार म्हणून आणि बापूसाहेब भेगडे, बबनराव भेगडे, गणेश खांडगे, माऊलीभाऊ दाभाडे हे सर्वजण पदाधिकारी म्हणून तालुक्यात काम करीत राहिले. आजमितीच मावळ तालुक्यातील नंबर एकचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यामुळे पक्षाला सुगीचे दिवस आलेले असल्याने आता तरी पक्षाचे जुणे जाणते एकनिष्ठ सेवक म्हणून बापूसाहेब भेगडे यांना आमदार बनण्याची संधी मिळावी अशी इच्छा राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी आणि बापू भेगडे यांच्या जवळच्या सहकारी, समर्थकांची आहे. परंतु पक्षात आणि मावळात सध्या आमदार सुनिल शेळके यांच्याच नावाची चलती आहे किंबहुना त्यांच्याच नावाची चर्चा होतेय.

tata tiago ads may 2025

एकीकडे सुनिल शेळके हे दुसऱ्यांदा आमदार बनण्याच्या तयारीत लागले असताना किमान पक्षाने एकदा तरी बापू अण्णांना आमदार बनवावे, असे काही कार्यकर्त्यांना वाटते. त्यामुळेच मागील अनेक महिन्यांपासून पक्षातीलच एक गट बापू भेगडे यांच्यासाठी सायलेंट कॅम्पेनिंग करीत आहे. त्यांच्या कॅम्पेनला ‘मी देखील इच्छुक’ अशा शब्दांत स्वतः बापू साहेबांचीही साथ मिळतेय. परंतु आमदार सुनिल शेळके यांच्या नावाची चर्चा आणि दबदबा बघता, ही नुसती चर्चा काही कामाची नसल्याचे दिसतंय. त्यासाठी बापू आणि त्यांचे समर्थक यांना खुलेपणाने आणि तीव्र भुमिकेने समोर यावं लागेल. मात्र ही तीव्रता काही बापूसाहेब आणि त्यांच्या गोटात दिसत नाही.

बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील बापू साहेब भेगडे यांनी त्यांची इच्छा बोलून दाखविली. त्यासाठी महामंडळाचा त्यागही बोलून दाखविला. पण, काही केल्या मी लढणार अशी तीव्रता मात्र त्यांच्या भुमिकेत नव्हती. माध्यम प्रतिनिधींनी त्यांना दोनदा खोदून विचारले तरीही त्यांनी पक्षाचा निर्णय, दादांचा निर्णय एवढीच भुमिका मांडली. त्याच्याही पुढे, नाही मिळालं तर कार्यकर्ते जे सांगतील, त्याप्रमाणे करू असेही ते म्हणाले. राजकारण म्हणून त्यांचे बोलणे कदाचित योग्यही असेल, परंतु कार्यकर्त्यांना जोश, बळ देण्यासाठी मात्र ही वक्तव्ये कमी पडतात.

दुसरीकडे भाजपातील बाळा भेगडे, रविंद्र भेगडे हे नेते मात्र तिकीट मिळेल न मिळेल पण लढायचंच ह्या आत्मविश्वासात कार्यकर्त्यांसमोर जातात. तो कॉन्फिडन्स बापू आणि त्यांच्या सल्लागारांत दिसत नाही. त्यामुळे कुठे तरी त्यांच्यावर जीव लावणारे कार्यकर्तेही संभ्रमावस्थेत असल्याचे दिसतात. याचा फायदा अपसूकच सुनिल शेळकेंना होतोय, हे वेगळे सांगायला नको.

पक्षाचा निर्णय मानून आजवर थांबणारे बापूसाहेब ना पक्षासाठी नवीन आहेत, ना कार्यकर्त्यांसाठी नवीन आहेत. त्यामुळे यंदाही तसंच होणार का? ही शंका कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची ही शंका आता तरी बापूअण्णांनी दुर करावी, अशी चर्चा तालुक्यात आहे. कारण निवडूक आता अंगणात नाही तर दारात आहे, अशावेळी निर्णय घेऊ असं बोलण्यापेक्षा निर्णय घ्या… विधानसभा लढवायचीये, असं बोलण्यापेक्षा विधानसभा लढवाच.. असा हट्ट बापूसाहेब भेगडेंवर प्रेम करणारे त्यांचे खंदे कार्यकर्ते मावळात धरत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अवघ्या दोन सेकंदाच्या व्हिडिओमुळे लागला ‘त्याचा’ शोध ; शिवदुर्ग रेस्कू टीमच्या अनुभवाचा कस पाहणारे सर्च ऑपरेशन यशस्वी !
– ‘मी दुर्गा’ बेस्ट सेल्फी आणि रिल्स स्पर्धेतील विजेत्या प्रतिभा थोरात यांचा सन्मान । Vadgaon Maval
– कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात? कोजागिरी शब्दाचा अर्थ काय? कोजागिरी पौर्णिमेला दूध का पितात? जाणून घ्या सर्वकाही


dainik maval ads may 2025

Previous Post

जय मल्हार ग्रुप आयोजित ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमाला 900 महिलांची हजेरी, पुजा शिंदे ठरल्या मानाच्या पैठणीच्या मानकरी । Vadgaon Maval

Next Post

एकविरा विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप । Karla News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Distribution of educational materials to students of Ekvira Vidya Mandir School

एकविरा विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप । Karla News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde

वारकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार, वारीतील सहभागी वाहनांना टोल माफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

June 1, 2025
Scholarship

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया 15 जूनपासून सुरू होणार

June 1, 2025
Villagers strongly oppose new design of flyover at Malavali railway station Maval

मळवली रेल्वे स्टेशन येथील उड्डाणपुलाच्या नवीन आराखड्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध । Karla News

June 1, 2025
Kamshet Gram Panchayat Maval

कामशेत ग्रामस्थांचा लढा यशस्वी ! ग्रामपंचायतीची तीस टक्के करवाढ अखेर रद्द ; बीडीओंचा आदेश । Kamshet News

June 1, 2025
Ashadhi Wari Palkhi ceremony is approaching When will dehu Palkhi route be repaired

आषाढी वारी पालखी सोहळा तोंडावर ; पालखी मार्गाची दुरूस्ती कधी होणार?

June 1, 2025
Kamshet police seize illegal stock of kerosene in Mundhaware village maval

कामशेत पोलिसांकडून मुंढावरे गावात रॉकेलचा अवैध साठा जप्त । Kamshet News

June 1, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.