1. निवडणूक प्रचारासाठी दहापेक्षा अधिक वाहनांच्या ताफ्यास निर्बंध –
विधानसभा निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक प्रचारासाठी दहा पेक्षा अधिक मोटारगाड्या, वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्बंध आदेश जारी केले आहेत.
हे आदेश २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अंमलात राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणारे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील तरतुदीनुसार व भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
2. निवडणूक साहित्य रहदारीस अडथळा होईल असे लावण्यास निर्बंध –
पुणे जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान कोणतेही निवडणूक संबंधी साहित्य रहदारीस अडथळा होईल व अपघात होईल असे लावण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्बंध आदेश जारी केले आहेत. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी अथवा त्यांच्या हितचिंतकांनी सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, निवडणुकी संबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट्स, होर्डींग्ज, कमानी आदी रहदारीस अडथळा निर्माण होवू शकेल व अपघात होईल अशा पद्धतीने लावण्यावर निर्बंध घाण्यात आले आहेत.
हे आदेश २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अंमलात राहतील. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित हे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार व भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
3. खासगी, सार्वजनिक जागेवर निवडणूक प्रचारसाहित्य लावण्यास निर्बंध –
विधानसभा निवडणूक कालावधीत खासगी व्यक्तींच्या जागेवर व सार्वजनिक प्राधिकरणाच्या जागेवर संबंधितांच्या परवानगी शिवाय निवडणूक प्रचाराचे साहित्य लावण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्बंध आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी अथवा त्यांच्या हितचिंतकाने निवडणूकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहिणे इत्यादीकरीता कोणत्याही व्यक्तीच्या खासगी जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर संबंधित मालकीच्या परवानगी शिवाय व संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाची परवानगी शिवाय वापर करण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत.
हे आदेश २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अंमलात राहतील. तसेच आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित हे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार व भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
4. सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरत्या स्वरुपात पक्ष कार्यालय स्थापन करण्यास निर्बंध –
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरत्या स्वरुपात पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्बंध घालण्याचे आदेश जारी केले आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत हे आदेश अंमलात राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणारे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार व भारतीय न्याय संहिता-२०२३ कलम २२३ प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील.
5. नमुना मतपत्रिका छपाई करण्याबाबत निर्बंधात्मक आदेश जारी –
राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी, त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी मुद्रणालयाचे मालक व इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकांनी तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापताना इतर उमेदवाराचे नाव व त्यांनी नेमून देण्यात आलेले चिन्ह, नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे तसेच आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापण्याबाबत निर्बंध घालण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.
हे आदेश २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अंमलात राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार व भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ प्रमाणे संबंधित हे दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कामशेत बोगद्याजवळ टेम्पो उलटून अपघात, एकाचा जागीच मृत्यू
– केटीएसपी मंडळाच्या नव्या विधी महाविद्यालयाची खोपोली शहरात सुरुवात । Khopoli News
– लोणावळ्यात संत तुकाराम साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटप । Lonavala News