Dainik Maval News : विधानसभा निवडणूकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 38 जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. अपेक्षेप्रमाणे अजित पवार यांच्या बंडात त्यांच्या सोबत राहिलेल्या बहुतांश आमदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. यात पहिल्याच यादीत मावळ विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडून विद्यमान आमदार सुनिल शेळके यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
आमदार सुनिल शेळके यांना सलग दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ विधानसभेची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी यादी जाहीर झाल्यानंतर आणि मावळात शेळकेंना पुन्हा उमेदवारी मिळाल्याचे समजल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ( Nationalist Congress Party NCP Ajit Pawar announced candidature of Sunil Shelke in Maval Assembly Constituency )
खरेतर मावळ विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्षाचे जुणे जाणते नेते बापूसाहेब भेगडे हेही इच्छुक होते. मात्र जाहीर झालेल्या यादीत आमदार सुनिल शेळके यांच्यावरच अजित पवारांनी विश्वास दाखवित त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देऊ केलीये. त्यामुळे आता बापूसाहेब भेगडे पुढे काय निर्णय घेतात, हे पाहावे
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ उत्साहात
– निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने पक्ष, नेते, कार्यकर्ते सर्वांसाठीच नियमावली जाहीर ; वाचा नियमावली सविस्तर । Pune News
– पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर एसटी बस आणि ट्रक यांचा अपघात – एकाचा मृत्यू, इतर प्रवासी जखमी । Kamshet News