Dainik Maval News : रविवारी (दि.20) भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणूकीसाठी आपल्या 99 जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर बुधवारी (दि. 23) अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या 38 जागांवरील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत मावळ विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सुनिल शेळके यांनाच पक्षाकडून दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली.
राज्यात शिवसेना – भाजपा – राष्ट्रवादी हे तिनही पक्ष महायुती म्हणून विधानसभा निवडणूकांना सामोरे जात आहे. अशात राष्ट्रवादीकडून मावळमध्ये सुनिल शेळके यांना उमेदवारी जाहीर झाल्याने मावळची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली हेही जाहीर झाले असून महायुतीचे उमेदवार येथे सुनिल शेळके हेच असणार यावरही एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे. अशात महायुतीत भाजपाकडून इच्छुक असणारे बाळा भेगडे, रविंद्र भेगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असणारे बापूसाहेब भेगडे आता पुढे काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण मावळवासीयांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
मावळात राष्ट्रवादी सोबत भाजपा हा ताकदवान पक्ष आहे. मावळ विधानसभा हा भाजपाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे 2 ऑगस्टच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजपाच्या नेत्यांनी मावळची जागा राष्ट्रवादीला न सुटल्यास तालुक्यात सांगली पॅटर्न करण्याचा इशारा दिला होता. तर बापूसाहेब भेगडे यांनीही कार्यकर्ते सहकारी यांसोबत बसून पुढील निर्णय ठरविणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मावळच्या राजकारणात अजून काय घडामोडी घडणार हे पाहावे लागेल.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ उत्साहात
– निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने पक्ष, नेते, कार्यकर्ते सर्वांसाठीच नियमावली जाहीर ; वाचा नियमावली सविस्तर । Pune News
– पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर एसटी बस आणि ट्रक यांचा अपघात – एकाचा मृत्यू, इतर प्रवासी जखमी । Kamshet News