Dainik Maval News : भारतीय जनता पार्टी पक्षाने मावळच्या उमेदवारीबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. हा निर्णय जाहीर झाल्यानंतरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असे भाजपाचे मावळ विधानसबा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी सांगितले. सोमवारी (दि.21) रात्री तातडीने बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत भेगडे यांनी हे वक्तव्य केले.
पत्रकार परिषदेला रविंद्र भेगडे यांसह माजी तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, माजी उपसभापती शांताराम कदम, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार हेही उपस्थित होते. रविंद्र भेगडे हे मावळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीच्या रिंगणात असतील का? याबाबत मावळच्या जनतेत आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळेच सोमवारी पत्रकार परिषदेत रविंद्र भेगडे काय बोलणार, नेमकी कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. परंतु, कोणतीही मोठी घोषणा करण्याचे टाळून रविंद्र भेगडे यांनी काही मुद्द्यांवर भाष्य केले.
पक्षाने दिलेली समन्वयक पदाची जबाबदारी नाकारली
रविंद्र भेगडे यांनी सोमवारी तळेगाव येथील पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच महत्वाची माहिती माध्यमांना दिली. रविंद्र भेगडे यांना पक्षाने विधानसभा निवडणूकीसाठी ‘मावळ विधानसभा समन्वयक’ ह्या पदाची जबाबदारी देऊ केली होती, ती जबाबदारी भेगडे यांनी स्विकारली नाही. रवी भेगडे यांनी पक्षाने देऊ केलेले हे पद आणि जबाबदारी नाकारली असून पक्षाने आता अशा पद, जबाबदाऱ्यांऐवजी मी मावळची उमेदवारी मागत आहे, ती उमेदवारी द्यावी, असे स्पष्टपणे सांगितले.
परिवर्तन घडवायचं आहे…
रविंद्र भेगडे म्हणाले की, गेल्या पाच वर्षात मावळात सुरू असलेली दडपशाही रोखण्यासाठी भाजपाने ही जागा स्वतःकडे घ्यावी आणि भाजपाचा उमेदवार म्हणून मला संधी द्यावी. पक्षाने मला मावळ विधानसभा समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे, पण ती मला मान्य नाही. त्या ऐवजी पक्षाने मला विधानसभेची उमेदवारी द्यावी. मावळात आम्हाला आता परिवर्तन घडवायचे आहे. मावळात सर्वसामान्यांना होणारा त्रास, अडवणूक वाचविण्यासाठी ही निवडणूक लढवणे महत्त्वाचे आहे, असे भेगडे म्हणाले.
मावळ तालुक्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पवना धरणग्रस्तांचे प्रश्न, पवना बंद जलवाहिनी, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न, दहशत-दादागिरी पासून मावळला मुक्त करायचे आहे, अशा अनेक बाबींवर त्यांनी आपले मत पत्रकार परिषदेत मांडले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने कामशेत आणि वडगाव मावळ पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटलांसोबत प्रशासनाची बैठक
– भाजपाने दिलेली ‘ती’ जबाबदारी रविंद्र भेगडे यांनी नाकारली ; पक्षाने मावळमधून उमेदवारी द्यावी यावर ठाम ! Maval Vidhan Sabha
– मोठी बातमी ! अजित पवारांकडून यादी जाहीर, आमदार सुनिल शेळके यांचे नाव गायब, चर्चांना उधाण, पाहा यादी…