Dainik Maval News : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार २२ ऑक्टोबर २०२४ पासून संबंधित विधानसभा मतदार संघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांचे पत्ते जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जाहीर केले आहेत.
निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी २२ ते २९ ऑक्टोबर असून या नामनिर्देशन पत्रांची छाननी ३० ऑक्टोबर रोजी आहे. ४ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ही सर्व प्रक्रिया संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात केली जाणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या कार्यालयाचा पत्ता :
२०४- मावळ विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले (भ्र.ध्व. ७०२००४६४६१), पत्ता- तहसील कार्यालय, वडगाव मावळ, ई- मेल sdomaval@gmail.com, २०५- चिंचवड विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार (भ्र. ध्व. ९४२२९४३५४९), पत्ता- पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय, थेरगांव, पुणे, ई-मेल 205chinchwadele@gmail.com, २०६- पिंपरी विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अर्चना यादव (भ्र.ध्व. ९७६७२१८९०१), पत्ता- डॉ. हेडगेवार भवन, सेक्टर नं. २६, निगडी, पुणे, ई-मेल 206pimpriac2014@gmail.com असा पत्ता आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अबब ! पुणे जिल्ह्यात 3 हजार 677 नागरिकांकडे शस्त्रांचा परवाना ; पावणेचार हजार शस्त्रे जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
– परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन, नुकसानग्रस्तांना भरपाई द्या – मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
– मावळच्या जागेबाबत अधिकृत निर्णय समोर आल्यानंतर आम्ही आमची भुमिका जाहीर करू – रविंद्र भेगडे