Dainik Maval News : मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मला खोट्या प्रकरणात गोवून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत, ते त्यांनी मागे घ्यावेत अन्यथा या निवडणुकीत त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील, असा इशारा पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी दिला आहे.
बाळासाहेब नेवाळे समर्थकांनी वडगाव मावळ येथे आयोजित केलेल्या निषेध मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ भाजपाचे माजी अध्यक्ष रवींद्र भेगडे, बाबुराव वायकर, प्रशांत ढोरे, शांताराम कदम, नारायण गायकवाड, मंगेश ढोरे, लक्ष्मण बालगुडे आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
मेळाव्यात बाळासाहेब नेवाळे यांनी आमदार शेळके यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आपण कुठून कुठून कशा पद्धतीने पैसे कमवता मला जनतेसमोर सांगायला भाग पाडू नका आणि मला तोंड उघडायला लावू नका, असेही ते म्हणाले.
गेल्या पाच वर्षांत राजकारण खूप खालच्या थराला गेले आहे. हे मला मान्य नाही. आम्ही राजकारण केले. लोकांना मदतही केली मात्र आमदारांनी पोलिसांना हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल केले. त्याला कसलाही आधार नाही, हे मला अजिबात मान्य नाही. पाच महिने जामीन मिळणार नाही, असे गुन्हे दाखल केले. गोवित्री सोसायटीचा संचालक मी नव्हतो तरी पण मला त्यात गोवून चुकीच्या गुन्हात अडकवले, असा आरोप नेवाळे यांनी केला.
नेवाळे पुढे म्हणाले की, मीही तालुक्यात 30 वर्षे झाली राजकारण करत आहे. ज्येष्ठ नेते माजी मंत्री मदन बाफना, दादा सातकर, बी एस गाडे पाटील, विश्वनाथराव भेगडे, दिगंबरदादा भेगडे, बाळा भेगडे, दिलीप टाटिया आदी मान्यवरांनी तालुक्यांमध्ये समाजाला आधार होईल, मदत होईल तसेच समाज प्रोत्साहित होईल असे राजकारण केले. हे आम्ही पाहिले आहे. पण आताची परिस्थिती बदलली असल्याचे नेवाळे म्हणाले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कान्हे – नायगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पुजा चोपडे यांची निवड । Kanhe News
– अबब ! पुणे जिल्ह्यात 3 हजार 677 नागरिकांकडे शस्त्रांचा परवाना ; पावणेचार हजार शस्त्रे जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
– परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन, नुकसानग्रस्तांना भरपाई द्या – मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश