काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. लोणावळा शहरातही भारतीय जनता पार्टीकडून राहुल गांधींच्या विधानाचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. तसेच, स्थानिक पोलिसांकडे तक्रार अर्ज करण्यात आला. ( Congress Rahul Gandhi statement against Vinayak Damodar Savarkar Lonavala BJP agitation )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“स्वातंत्र्यवीर सावरकरजी का अपमान…नहीं सहेगा हिंदुस्थान”
कुशल हिंदू संघटक, स्वातंत्र्यसेनानी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा दरम्यान बोलताना आक्षेपार्ह विधान केले. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी लोणावळा शहरातील स्वातंत्रवीर सावरकर चौक, भांगरवाडी-लोणावळा येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तसेच पक्षाचे अन्य सदस्य उपस्थित होते. ( Congress Rahul Gandhi statement against Vinayak Damodar Savarkar Lonavala BJP agitation )
‘काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातुन जात असून महाराष्ट्रात त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर” यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य करून समस्त हिंदू जनासह महाराष्ट्राच्या जनमानसाचे मन दुखवण्याचे काम काँग्रेस करत आहे,’ अशी टीका यावेळी आंदोलकांनी केली.
अधिक वाचा –
– खळबळजनक! तळेगाव दाभाडेतील आरोपी संजय कार्लेचा मुंबई-गोवा महामार्गावर खून, बंद गाडीत आढळला मृतदेह
– तुमच्याकडेही भाडेकरू आहेत का? 7 दिवसांत लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे माहिती सादर करा, अन्यथा…