मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा अभयारण्याजवळ दिनांक 18 नोव्हेंबर 2022 (शुक्रवार) रोजी पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीत तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील आरोपी संजय मारुती कार्ले (रा. अनिकेत अपार्टमेंट, यशवंत नगर, तळेगाव – दाभाडे) याचा खून झाला आहे. या व्यक्तीवर तळेगाव – दाभाडे पोलीस स्टेशन येथे गु.र. नंबर 656/2018 भादवि कलम 420, 354, 506 आणि मोका अन्वये गुन्हे दाखल आहेत. या दाखल गुन्ह्यात नमूद आरोपी हा सहा महिन्यांपूर्वी वैद्यकीय रजेवर मुक्त होता आणि त्यानंतर त्याला कायमस्वरूपी जामीन मिळाला होता. ( Talegaon Dabhade Accused Sanjay Karle Murdered On Mumbai Goa Highway )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
संजय मारुती कार्लेवर दाखल गुन्ह्यात त्याच्या सोबत असणारे गुन्हेगारांची नावे खालील प्रमाणे;
1. प्रकाश उर्फ पिंट्या गोपाळ साळवे
2. महिंद्र गोपाळ साळवे
3. आकाश प्रकाश साळवे
4.तेजस प्रकाश साळवे
5. सिद्धार्थ महेंद्र साळवे
6.मीनाक्षी प्रकाश साळवे असे आरोपी असून सर्व आरोपी हे जामीनवर मुक्त आहेत.
संजय रमेश कारले हा अधून मधून तळेगावमध्ये राहण्यास असून तो लपून तो लपून छपून राहत असे, अशी माहिती पुढे आली आहे. डुप्लीकेट गोल्डन कॅाईन देवून लोकांना फसवणूक करण्याच्या प्रकरणी तो सवयीचा गुन्हेगार होता, असेही समजते.
अधिक वाचा –
– तुमच्याकडेही भाडेकरू आहेत का? 7 दिवसांत लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे माहिती सादर करा, अन्यथा…
– सोशल मीडियाची कमाल; डोंगरगाव परिसरातून बेपत्ता झालेल्या मुलाचा अवघ्या 3 तासात शोध