व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ विधानसभेचे महायुतीचे उमेदवार सुनिल शेळके यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ । Sunil Shelke

तुम्ही नेत्यांना घेऊन लढा, मी जनतेला बरोबर घेऊन लढतो - आमदार सुनिल शेळके

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 3, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Maval Vidhan Sabha election campaign of Sunil Shelke has started

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील बहुतांश प्रस्थापित पुढाऱ्यांनी एकत्र येऊन मला एकटं पाडण्याचा प्रयत्न चालवला आहे, पण मावळातील तमाम जनता माझ्या मागे आहे. तुम्ही नेत्यांना घेऊन लढा मी जनतेला घेऊन लढतो, असे खुले आव्हान मावळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांनी दिले.

Novel NIBR Ads

मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील शेळके यांनी वडगाव मावळचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांच्यासमोर श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला. त्यानंतर पंचायत समिती समोर झालेल्या जाहीर सभेत शेळके बोलत होते.‌

त्यावेळी खासदार श्रीरंग बारणे, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, गणेश ढोरे, रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर, एकविरा देवस्थानचे विश्वस्त दीपक हुलावळे, वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, भाजपचे माजी नगरसेवक देविदास कडू, सुरेश दाभाडे तसेच किरण गायकवाड, देवा गायकवाड, बबन ओव्हाळ, हरीश कोकरे, पंढरीनाथ ढोरे आदी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या २० मिनिटांच्या भाषणात सुनील शेळके यांनी विरोधकांवर आक्रमक पद्धतीने हल्ला चढवला. काही पुढार्‍यांनी मला तालुक्यात एकटे पाडायचा प्रयत्न चालवला आहे. त्याची प्रतिक्रिया म्हणून एवढी मोठी जनता माझ्या पाठीशी जमा झाली आहे. व्यासपीठावरील ५० पुढारी म्हणजे मावळची जनता नाही. माझ्यावर टीका करणाऱ्या पुढार्‍यांच्या माता- भगिनी देखील माझ्याबरोबर आहेत. तुम्ही नेत्यांना घेऊन लढा, मी जनतेला बरोबर घेऊन लढतो, असे आमदार शेळके यांनी विरोधकांना सुनावले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– लोणावळा ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी ! अवघ्या तीस तासात खुनातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या । Maval Crime
– मोठी बातमी ! पवनमावळातील विसापूर किल्ल्यावर सापडले शिवकालीन तोफगोळे । Maval News
– वडगाव मावळ शहरात पोलिसांचा सशस्त्र रुट मार्च । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

मावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना मनसेचा पाठिंबा । Bapu Bhegade

Next Post

तुम्ही नेत्यांना घेऊन लढा, मी जनतेला बरोबर घेऊन लढतो – वाचा आमदार सुनिल शेळके यांच्या भाषणातील संपूर्ण मुद्दे

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Assembly Election Mahayuti candidate Sunil Shelke election campaign has started

तुम्ही नेत्यांना घेऊन लढा, मी जनतेला बरोबर घेऊन लढतो - वाचा आमदार सुनिल शेळके यांच्या भाषणातील संपूर्ण मुद्दे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाटण (ता. मावळ) दरड दुर्घटना । ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकाचा मृत्यू, अन्य दोघांचा शोध सुरू

पाटण (ता. मावळ) दरड दुर्घटना । ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकाचा मृत्यू, अन्य दोघांचा शोध सुरू

July 6, 2026
Pavana direct parallel pipeline project will be implemented only with consent of farmers in Maval CM Devendra Fadnavis

पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प मावळातील शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 5, 2026
Clarification regarding trial run of water supply scheme under Talegaon Municipal Council Viral Video

व्हायरल होत असलेल्या ‘त्या’ व्हिडिओबाबत तळेगाव नगरपरिषदेचा खुलासा ; “सदर घटना ही कोणत्याही निकृष्ट कामाची नसून…”

July 5, 2026
Lonavala Rain Updates

Lonavala Rain : लोणावळा शहरात हंगामातील सर्वाधिक पाऊस ! रस्ते पाण्याखाली, अतिक्रमणांमुळे अनेक भाग जलमय

July 5, 2026
Malwandi Thule dam Pavan Maval

पवन मावळ परिसरात दमदार पाऊस ! पवना धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ; ओढे-ओहोळ प्रवाहित झाल्याने पाण्याची आवक सुरू

July 5, 2026
No royalty charged for using soil or murrum from one own farm no police or revenue action will be taken either

शेतकऱ्यांना दिलासा! स्वतःच्या शेतातील माती-मुरूम वापरल्यास रॉयल्टी नाही; पोलीस वा महसूल कारवाईही होणार नाही

July 3, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.