Dainik Maval News : राज्यात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात देखील महायुतीचे उमेदवार सुनिल शेळके आणि अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्यात कडवी लढत होणार असल्याचे दिसत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष (मनसे) मावळ तालुका यांच्या पदाधिकाऱ्यांनी आपला पाठींबा बापू भेगडे यांना जाहीर केला आहे.
वडगाव येथे नुकतीच मावळ तालुका मनसे ची महत्वपूर्ण बैठक पार पडली. त्यात अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. मनसेचे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांनी मावळ विधानसभेचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या पाठिंब्याबाबतचा ठराव बैठकीत मांडला व तो पदाधिकाऱ्यांनी एकमताने मंजूर केला.
यावेळी महिला आघाडी अध्यक्षा ज्योती पिंजण, कोर कमिटी सदस्य सुरेश जाधव,संजय शिंदे, तानाजी तोडकर,पांडुरंग असवले उपाध्यक्ष संतोष मोधळे,अनिल लालघुडे,संदीप शिंदे,आनंता तिकोने, विनायक गाडे शहराध्यक्ष मच्छिंद्र मोहिते,सूरज भेगडे,सुरेश भीगानिया, बालाजी झोंबाडे,विजय गायकवाड, संगीता गुजर,अर्चना ढोरे, शोभा कळसकर तसेच शाखा अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील महिला आणि तरुणांमध्ये बापूसाहेब भेगडे यांच्या व्हिजनची चर्चा । Bapu Bhegade
– मावळ हादरलं ! ऐन निवडणूकीच्या धामधुमीत भाजपा पदाधिकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या । Maval Crime
– ‘चिंचवड’च्या राजकारणातून ‘मावळ’वर निशाणा ! सुनिल शेळकेंसाठी अजितदादा मैदानात ? ‘मावळ पॅटर्न’ला उत्तर देणारा ‘चिंचवड पॅटर्न’