Dainik Maval News : अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठींबा देण्याबाबत भाजपा बरोबरच महाविकासआघाडीतील घटकपक्षांचे मतदार द्विधा मनस्थितीत आहे. त्यामुळे ‘मावळ पॅटर्न’च्या नावाखाली निर्माण करण्यात आलेल्या फुग्यातील हवा निघून जाण्याच्या मार्गावर आहे. निवडून आल्यास सरकार बनविण्यासाठी बापूसाहेब भेगडे कुणाला पाठिंबा देणार, हे भेगडे यांनी आधी जाहीर करावे, अशी मागणी महाविकासआघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते करीत आहेत.
भाजपा व महाविकास आघाडीचे नेते बापूसाहेबांच्या व्यासपीठावर एकत्र आल्याचे चित्र दिसत असले तरीही बापूसाहेबांना मत म्हणजे नेमके कोणाला मत, हा प्रश्न भाजपा बरोबरच महाविकास आघाडीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना सतावत आहे.
बापूसाहेब भेगडे यांना भाजपाचे नेते मदत करीत असल्यामुळे निवडून आल्यानंतर बापूसाहेब भाजपलाच पाठिंबा देतील, असे भाजपाच्या निष्ठावान मतदारांना सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे महाविकासआघाडीतील प्रमुख घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी याप्रकारामुळे आता सावध पावित्रा घेतला आहे. बापूसाहेब भेगडे यांनी त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट केल्याशिवाय प्रचारात सक्रीय होणार नाही, अशी प्रतिक्रिया या कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.
बापूसाहेब भेगडे हे दोन्ही दगडांवर पाय ठेवून राजकारण करणार असतील, तर त्यांचे काम आम्ही का करायचे, असा प्रश्न मविआचे कार्यकर्ते करीत आहेत. भेगडे यांच्या व्यासपीठावर आम्ही उपस्थित राहिलो असलो तरी आमच्या पक्षानी बापूसाहेब भेगडे यांना अद्यापी अधिकृत पाठिंबा जाहीर केलेला नाही. त्यामुळे बापूसाहेब भेगडे यांनी महाविकासआघाडीच्या सर्वच पक्षांचा पाठिंबा गृहीत धरू नये, असा इशारा मविआतील एका प्रमुक घटकपक्षाने दिला आहे. या सर्व राजकीय घडामोडींमुळे ‘सर्वपक्षीय’ उमेदवार म्हणून स्वतःला मतदारांपुढे आणण्याचा भेगडे यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा डाव त्यांच्याच अंगाशी येताना दिसतोय.
शिवसेनेच्या पाठींब्यामुळे शेळकेंची ताकद वाढली
मावळ तालुक्यात आमदार सुनील शेळके यांना मानणारा मोठा वर्ग आहे. गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर आणि दांडगा जनसंपर्क यामुळे निवडणूकीत सुनील शेळके यांची बाजू वरचड ठरते. सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि महायुतीच्या नेत्यांची संपूर्ण ताकद शेळकेंच्या पाठीशी आहे. तसेच शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही महायुती धर्माचे पालन करण्याचे आदेश शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे सुनील शेळके यांची ताकद वाढली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– लोणावळा ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी ! अवघ्या तीस तासात खुनातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या । Maval Crime
– मोठी बातमी ! पवनमावळातील विसापूर किल्ल्यावर सापडले शिवकालीन तोफगोळे । Maval News
– वडगाव मावळ शहरात पोलिसांचा सशस्त्र रुट मार्च । Vadgaon Maval