Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होत आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलिसांचे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन कडून पवनानगर पोलीस मदत केंद्र हद्दीत सोमवारी (दि.४) रूट मार्च काढण्यात आला.
पवनानगर बाजारपेठ, तिकोनापेठ या ठिकाणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रुट मार्च काढण्यात आला. पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रश्नांत आवारे, पोलीस अंमलदार विजय गाले त्याचप्रमाणे पोलीस चौकी हद्दीतील पोलीस पाटील, तसेच बीएसएफ चे १९ जवान, पुणे ग्रामीण मुख्यालयाचे ११ जवान आणि इतर पोलीस अधिकारी रुट मार्चमध्ये सहभागी झाले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– “सुनीलअण्णांनी पाच वर्षे तालुक्याला भरभरून दिलंय, आता त्यांना भरभरून मतदान करूयात”
– कागदपत्रे दाखवून पंधरा दिवसांच्या आत बेवारस वाहने घेवून जाण्याच्या तळेगाव पोलिसांच्या सूचना । Talegaon Dabhade
– वडगावमधील ‘त्या’ तीनही नेत्यांनी पत्रकार परिषद घेवून आमदार सुनिल शेळके यांचे आरोप फेटाळले ; म्हणाले, आम्ही…