Dainik Maval News : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी (दि.15) सकाळच्या सुमारास मुंबई लेनवर किमी 40.100 येथे अपघात झाला. अपघातात टेम्पो क्रमांक MH05 DK8062 वरील चालक नामे अफसर अली खान (वय 28 रा. अंधेरी, एअरपोर्ट रोड, मुंबई) हा आपला टेम्पो पुणे कडून मुंबई दिशेने घेऊन जात असताना त्याचा ब्रेक फेल झाला आणि त्याची धडक समोरील ट्रक क्रमांक MH 46 CL 1660 ला बसली. अपघातात टेम्पोची केबीन दबल्याने चालक केबीन मध्ये अडकून पडला होता.
आय आर बी. पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान या सर्वांनी मिळून दोन क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला करून केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले. चालकाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर होऊन तो गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी एम जी.एम.कामोठे पनवेल येथे रवाना करण्यात आले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा – बोरघाटचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती हाताळली. हा अपघात खोपोली पोलीस स्टेशन हद्दीत झाला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सुनीलअण्णा तू एकटा नाही, मावळातील समस्त मातृशक्ती सदैव तुझ्या पाठीशी – रुपाली चाकणकर
– मावळात धक्कादायक प्रकार ; अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांनी महिला पत्रकाराला धमकावले, चार जणांविरोधात गुन्हा दाखल
– मतदारांनो… मतदान कार्डासह मतदानासाठी ‘हे’ 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावा म्हणून वापरता येणार – पाहा यादी