व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शांत – सुरक्षित आणि समृद्ध मावळसाठी उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा ‘वचननामा’ प्रसिद्ध । Bapu Bhegade

तरुणांना रोजगार, महिला सुरक्षा, शिक्षण - पर्यटन - उद्योग आदींचा जाहीरनाम्यात अंतर्भाव

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 17, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, व्हिडिओ, शहर
Manifesto of Bapusaheb Bhegde, independent candidate of Maval Assembly Constituency released

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील शहरांचा नियोजनबद्ध विकास, ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध, तरुणांना हमखास रोजगार, रस्ते व पायाभूत सुविधांचे जाळे, शैक्षणिक संस्थांना पाठबळ देणे, नागरी सुविधांचा विकास, शेती विकास व शेतीपूरक उद्योगातून रोजगार निर्मिती, हरीत चळवळीला प्राधान्य, क्रीडा व सांस्कृतीक ओळख निर्माण करणे, पिण्याचे शुद्ध पाणी व शेतीला पाणी उपलब्ध करून देणे, पर्यटनस्थळे विकास, सोमाटणे टोलनाका प्रश्न मार्गी लावणे, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असलेला वचननामा जाहीर केला असून, गेल्या पाच वर्षात मावळच्या खोळबलेल्या विकासाला गती देणार असल्याचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी वचननाम्यातून सांगितले.

बापूसाहेब भेगडे यांच्या वचननामा प्रकाशनप्रसंगी माजी मंत्री मदन बाफना, काँग्रेस नेते चंद्रकांत सातकर, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, भाजपा नेते गणेश भेगडे, भाजपचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय गुंड, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, शिवसेने तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, ॲड .रवींद्रनाथ दाभाडे, गुलाबराव म्हाळसकर,निवृत्तीभाऊ शेटे, सुकनशेठ बाफना, चंद्रशेखर भोसले आदी उपस्थित होते.

शहरे व ग्रामीण भागाचा नियोजनबद्ध विकास :
या वचननाम्यात तळेगाव दाभाडे, लोणावळा, देहूगाव, देहूरोड व वडगाव या शहरांचा नियोजनबद्ध विकास करणे, ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे, तळेगाव दाभाडे शहर लोडशेडिंग मुक्त व डस्टबिनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मावळ तालुक्यातील रस्त्यांची सध्या दुरावस्था आहे. ही दुरावस्था दूर करण्यासाठी तालुक्यातील रस्त्यांचे जाळे अधिक सक्षम करण्यास प्राधान्य, औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, वीज, पाणी या सुविधामध्ये सुसूत्रता आणणार आहे. सांस्कृतीक तळेगावात सुसज्ज अशा नाट्यगृहाची उभारणी, सोमाटणे टोल नाका प्रश्न मार्गी लावणार आहे.

तरुणाईला रोजगार देण्यास कटिबद्ध :
मावळमध्ये गेल्या पाच वर्षात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. ती दूर करण्यासाठी अनेक कंपन्यांच्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यास बांधील आहोत. विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण देऊन रोजगारक्षम बनविणार, नामांकित इंजिनिअरिंग कॉलेज सोबत करार करून विविध प्रकारचे सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्ध करून देणार आहे. दुर्गम, आदिवासी भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळा सक्षम करणार आहे.

शेतकरी, महिलांना सक्षम करणार :
नियोजित कृषी विद्यापीठाची ३५ एकर जागेमध्ये उभारणी, शेतीपूरक उद्योग व्यवसायासाठी प्रशिक्षण, शासकीय योजनांचा निधी मावळ तालुक्यातील नागरिकांपर्यत पोहोचविणार, महिला सक्षमीकरणासाठी पायाभूत काम उभे करणार, दारिद्यरेषेखालील लोकांना मुख्य प्रवाहात आणणार, तळेगाव दाभाडे बाजार समितीच्या जागेत शेतीमालाला योग्य हमीभाव व बाजारभाव मिळवून देणारे भव्य मार्केट उभारणार, इंद्रायणी तांदळाला हमीभाव देण्यास बांधील आहोत.

सरदार दाभाडे घराण्याचा सचित्र इतिहास जगासमोर आणणार :
संपूर्ण भारतवर्षात प्रसिद्ध असलेल्या सरदार दाभाडे घराण्याचा सचित्र इतिहास जगासमोर आणणार आहे. तसेच स्व. किशोर आवारे यांनी कष्टकरी व्यवसायिकांसाठी सुरू केलेल्या भाजी मंडईला अधिक व्यापक स्वरूप देणार आहे.

मावळला पर्यटन तालुका म्हणून विकसित करणार :
मावळला पर्यटन तालुका म्हणून विकसित करण्यासाठी निधी उभारणार असून, ऐतिहासिक गड, किल्ले, लेण्यांचे संवर्धन, लोणावळा येथील स्कायवॉक प्रकल्प व कार्ला येथील रोपवे प्रकल्प कार्यान्वित करणार आहोत. तसेच कार्ला येथे MTDC चे भव्य गेस्ट हाऊस उभारणार आहे.

सिंचन सुविधा देणार :
नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारी पाणीपुरवठा योजना पवना व इंद्रायणी नदीपात्रांचे प्रदूषणामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी प्राधान्याने काम करणार, नद्यांवर बंधारे व नदी खोलीकरणातून सिंचनाच्या सोयी उपलब्ध देणार आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांनी आंबेडकरी जनतेला सर्वाधिक न्याय दिला – सूर्यकांत वाघमारे
– मावळ विधानसभा मतदारसंघात मतदार ओळख चिठ्ठी वितरणास सुरुवात । Maval Vidhan Sabha
– खून प्रकरणी तिघांना अटक ; मावळ तालुक्यातील नानोली येथील प्रकार । Maval Crime


dainik maval jahirat

Previous Post

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील मुंबई लेनवर दोन वाहनांचा भीषण अपघात, सुदैवाने चालक बचावला । Accident On Mumbai Pune Expressway

Next Post

भरधाव टेम्‍पोच्‍या धडकेत रिक्षाचालक जखमी, चाकण-तळेगाव रोडवरील घटना, गुन्हा दाखल

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Accident

भरधाव टेम्‍पोच्‍या धडकेत रिक्षाचालक जखमी, चाकण-तळेगाव रोडवरील घटना, गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.