Dainik Maval News : सुदुंबरे मधील अवैध दारू भट्टीवर पोलिसांनी छापा घालून एक लाख रुपये किंमतीचे रसायन नष्ट केले. याप्रकरणी एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाचचे पोलीस अंमलदार धनंजय लक्ष्मण भोसले (वय 52) यांनी गुरुवारी (दि.14) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मावळ तालुक्यातील सदुंबरे येथे राहणार्या एका ५६ वर्षी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदुंबरे येथे नदीकाठी एका महिलेने दारू भट्टी लावली असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा घालून त्याठिकाणी दारू तयार करण्यासाठी असलेले एक लाख रुपयांचे गूळ मिश्रित रसायन, पोलिसांनी नष्ट केले. मात्र पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी महिला झाडी झुडपातून पळून गेली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांनी आंबेडकरी जनतेला सर्वाधिक न्याय दिला – सूर्यकांत वाघमारे
– मावळ विधानसभा मतदारसंघात मतदार ओळख चिठ्ठी वितरणास सुरुवात । Maval Vidhan Sabha
– खून प्रकरणी तिघांना अटक ; मावळ तालुक्यातील नानोली येथील प्रकार । Maval Crime