Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तळेगाव दाभाडे येथील नूतन पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये होणार असल्याने या ठिकाणी विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी आणि वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतमोजणी शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्याच्या हेतूने येत्या शनिवारी (दि. 23) वाहतूक मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार तळेगाव दाभाडे शहर परिसरात वाहतुकीसंदर्भात यापूर्वी काही निर्बंध असतील, ते रद्द करण्यात येत असून खालील प्रमाणे तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येत आहेत. तळेगाव वाहतूक विभागाअंतर्गत येत्या शनिवारी (दि. 23 नोव्हेंबर) पहाटे 5 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अथवा मतमोजणी पूर्ण होईपर्यंत अत्यावश्यक सेवेतील पोलीस, अग्निशामक, रुग्णवाहिका तसेच निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट असलेली वाहने वगळून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे.
असे असतील वाहतुकीतील बदल :
– मुंबईकडून तळेगाव-चाकण रस्त्याने एचपी चौकाकडे जाणाऱ्या जड व अवजड वाहतुकीस प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग : या मार्गावरील वाहने वडगाव फाटा-वडगाव कमान (डावीकडे वळून) तळेगाव एमआयडीसी रस्त्यामार्ग नवलाख उंब्रे, बधालवाडी, भामचंद्र डोंगर, आंबेठाण, एचपी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
– मुंबईकडून चाकणच्या दिशेने जाणाऱ्या हलक्या वाहनांना व दुचाकीस वडगाव फाटा ते इंद्रायणी महाविद्यालयापर्यंतच्या मार्गावर बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग : या मार्गावरील वाहने वडगाव फाटा, निलया सोसायटी कार्नर (डावीकडे वळून) मंत्रा सिटी रोड मार्गे बीएसएनएल कॉर्नर (उजवीकडे वळून) काका हलवाई स्वीट मार्ट, शांताई सिटी कार्नर (डावीकडे वळून), हिंदमाता भुयारी मार्ग, जनसेवा वाचनालय इंद्रायणी महाविद्यालय येथे उजवीकडे वळून चाकण बाजूकडे जातील.
– चाकण एचपी चौकाकडून मुंबईच्या दिशोने जाणाऱ्या जड व अवजड वाहतुकीस चाकण-तळेगाव रस्त्यावर बंदी करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग : या मार्गावरील वाहने एचपी चौक, आंबेठाण, भामचंद्र डोंगर, बालवाडी, नवलाख उंब्रे,तळेगाव एमआयडीसी मार्गे इच्छित स्थळी जातील.
– चाकणकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या हलक्या वाहनांना व दुचाकींना इंद्रायणी महाविद्यालय, तळेगाव ते वडगाव फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग : या मार्गावरील वाहने जनसेवा वाचनालय, इंद्रायणी महाविद्यालय येथे (डावीकडे वळून) हिंदमाता भुयारी मार्ग, शांताई सीटी कार्नर(उजवीकडे वळून), बीएसएनएल कॉर्नर (डावीकडे वळून), मंत्रासिटी रस्ता मार्गे इच्छित स्थळी जातील.
उमेदवार व कार्यकर्त्यांसाठी व्यवस्था :
उमेदवार सुनिल शेळके – महायुतीचे उमेदवार सुनील शेळके व त्यांच्या कार्यकर्त्यांना मतमोजणीच्या दिवशी वडगाव फाटा ते स्वराज नगरीमार्गे येऊन माउंट सेंट अन स्कूलच्या वाहनतळामध्ये थांबण्याची व मैदानामध्ये वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
उमेदवार बापू भेगडे – अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे व त्यांच्या कार्यकर्त्यांना तळेगाव स्टेशन चौकातून हरणेश्वर सोसायटी मार्गे येऊन वाघळे पार्क, हरणेश्वर सोसायटी येथील अंतर्गत रस्त्यालगत तसेच भारत पेट्रोल पंप ते ईगल कार्नरपर्यंत सेवा रस्त्यावर वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कार्यकर्त्यांना थांबण्याकरिता नूतन पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या कमानीच्या उजव्या बाजूस व्यवस्था करण्यात आली आहे.
इतर अपक्ष उमेदवारांच्या कार्यकर्त्याकरिता दुय्यम निबंधक कार्यालयासमोरील अंतर्गत रस्त्यालगत वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांची थांबण्याकरिता दुय्यम निबंधक कार्यालयाजवळील मोकळ्या जागेत व्यवस्था करण्यात आली आहे.
अधिसूचनेप्रमाणे आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करुन पोलीस बंदोबस्त लावण्यात येत आहे. वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. तरी मतमोजणी कालावधीत नागरिकांनी दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा. – विशाल गजरमल, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, तळेगाव दाभाडे
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभा : तळेगाव शहरातील आमदार सुनील शेळके यांचा ‘रोड शो’ ठरणार ‘गेम चेंजर’
– मायबाप जनतेने मतदानरुपी आशीर्वाद द्यावेत ; प्रचाराची सांगता करताना आमदार शेळकेंचे भावनिक आवाहन
– ‘बापूसाहेब भेगडे यांचे सक्षम नेतृत्व लाभल्यास मावळ समृद्ध होईल’