व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, October 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘बापूसाहेब भेगडे यांचे सक्षम नेतृत्व लाभल्यास मावळ समृद्ध होईल’

महिला व तरुणांनी बापूसाहेब भेगडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे काकडे यांचे आवाहन

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 18, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
‘बापूसाहेब भेगडे यांचे सक्षम नेतृत्व लाभल्यास मावळ समृद्ध होईल’

Dainik Maval News : शांत, संयमी मावळ वासियांना निसर्गाची अमूल्य देणगी मिळालेली आहे. निसर्गाच्या मुबलक वरदानासोबतच मावळमधील तरुणांच्या हाताला काम, शिक्षण, महिला सुरक्षा, शेतीला मुबलक पाणी, फूल शेतीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग हे महत्वाचे प्रश्न सोडविल्यास मावळची प्रगती होईल. बापूसाहेब भेगडे यांच्या सक्षम नेतृत्वामुळे युवकांना रोजगार, महिला सुरक्षा, शिक्षण, पर्यटनामुळे मावळ होईल संपन्न. त्यासाठी अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना मावळच्या जनतेने निवडून द्यावे, असे आवाहन उद्योजक रामदास काकडे यांनी केले.

रामदास काकडे यांनी सांगितले, की राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर मावळचे नाव पोहोचले आहे ते इथल्या औद्योगिकीकरणामुळे आणि शेतीत होत असलेल्या वैविध्यपूर्ण प्रयोगांमुळे. तसेच तालुक्याचे वैशिष्ट्य म्हणजे रेल्वे आणि महामार्ग, जवाहरलाल नेहरू पोर्ट, विमानतळ यांची चांगली कनेक्टिव्हिटी असल्याने या तालुक्यात उद्योग, मोठ्या शैक्षणिक संस्थांनी मावळला प्राधान्य दिले आहे. मावळ तालुक्यात अनेक धरणे असल्याने मुबलक पाणी, उत्तम रस्ते, विजेची उपलब्धता, आणि महत्त्वाचे म्हणजे कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्यांना मावळने खुणावले आहे. जगभरातील उद्योग मावळ तालुक्यात येण्यास उत्सुक आहेत. जेसीबी, ह्युंदाई, एल अँड टी, कॉन्टीनेंटल यासारख्या कंपन्यांनी मावळमध्ये आपले उद्योग सुरू केले. नवलाख उंबरे, आंबी, मंगरूळ, आंबळे, टाकवे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग उभारणी झाली आहे.

पवन मावळात उद्योग उभारणी शक्य :
पवन मावळ पट्ट्यामधील उर्से, बऊर, करुंज, चांदखेड, परंदवडी या पट्ट्यामध्ये उद्योग उभारणी केल्यास त्याचा मावळ तालुक्याला मोठा फायदा होऊ शकतो.

लोणावळ्यात आयटी उद्योग येऊ शकतो :
लोणावळा, पवना, खांडी, कुसुर येथे पर्यटन उभारणीसाठी पोषक वातावरण आहे. लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण आहेच. शिवाय पर्यटननगरी म्हणूनही प्रसिद्ध आहे. यासोबतच ते मुंबईच्या जवळ असल्याने आयटी उद्योग येथे होऊ यशस्वी होऊ शकतो. त्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

देहूरोडचा रेडझोन सोडवणे गरजेचे :
देहूमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर असल्याने लाखो पर्यटक देहूला भेट देत असतात. त्यामुळे या परिसरात पर्यटन व्यवसाय वाढण्यास मोठी संधी आहे. देहूरोड येथील रेड झोन सोडवल्यास रहिवाशांवरील कारवाईची टांगती तलवार दूर होऊ शकेल.

बेरोजगारांना नोकरी व्यवसायाची संधी :
नियोजनबद्ध काम केल्यास मावळ तालुक्यातील बेरोजगार, तंत्रकुशल युवक युवतींना नोकरी, व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. महिलांना सुरक्षिततेबरोबरच शिक्षण व कंपन्यांमध्ये हाताला काम मिळेल.

पुणे मेट्रो लोणावळ्यापर्यंत व मावळात आणणे :
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील नित्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आजपर्यंत प्रयत्नच झाले नाहीत. पुणे मेट्रो निगडीपासून पुढे लोणावळ्यापर्यंत आणून, मावळमधील औद्योगिक पट्ट्यात मेट्रो फिरवल्यास मोठी कॉनेक्टिवीटी वाढून एमआयडीसीला मोठा फायदा होऊ शकतो.

फुलशेतीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग केल्यास शेतकरी फायदा :
मावळातील इंद्रायणी तांदूळ, तसेच फुल उद्योग यांचे मार्केटिंग करून फुले आणि तांदुळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा शक्य आहे. त्यादृष्टीने पावले टाकली पाहिजेत.

मनुष्यबळ वाढविण्यासाठी औद्योगिक अभियांत्रिकी महाविद्यालय आणण्यासाठी प्रयत्न :
ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागात बेरोजगार तरुण, महिलांसाठी ट्रेनिंग सेंटर उभारण्याची गरज आहे. कुशल मनुष्यबळ वाढविण्यासाठी औद्योगिक अभियांत्रिकी महाविद्यालय आणण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. तसे प्रयत्न झाल्यास मावळातील मोठ्या कंपन्यांना मनुष्यबळ मिळून बेरोजगारी दूर होण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून तालुक्यातील तरुण तरुणी शासकीय सेवेत यायला हवीत, यासाठी तालुक्यात अनेक गावात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणे गरजेचे आहे.


dainik maval jahirat

Previous Post

मायबाप जनतेने मतदानरुपी आशीर्वाद द्यावेत ; प्रचाराची सांगता करताना आमदार शेळकेंचे भावनिक आवाहन

Next Post

मावळ विधानसभा : तळेगाव शहरातील आमदार सुनील शेळके यांचा ‘रोड शो’ ठरणार ‘गेम चेंजर’

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
मावळ विधानसभा : तळेगाव शहरातील आमदार सुनील शेळके यांचा ‘रोड शो’ ठरणार ‘गेम चेंजर’

मावळ विधानसभा : तळेगाव शहरातील आमदार सुनील शेळके यांचा 'रोड शो' ठरणार 'गेम चेंजर'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Prize distribution ceremony for Late Suryakant Kaka Walunj Memorial Drawing Competition talegaon dabhade

सात हजार विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा गौरव! कै. सूर्यकांत काका वाळुंज स्मृती चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

October 26, 2026
Document registration Dast Nondani

सामायिक सातबारा असलेल्या जमिनींच्या विक्रीसाठी राज्यात नवा नियम; यापुढे ‘ही’ कागदपत्रे नसल्यास दस्त नोंदणी होणार नाही

October 25, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे – लोणावळा लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! रविवारी रेल्वे ब्लॉक, लोकलच्या फेऱ्या रद्द, एक्सप्रेसच्या वेळांत बदल

October 24, 2026
Pune Zilla Parishad

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर

October 24, 2026
30-foot-tall saffron flag has been hoisted on Tikona fort in Pavan Maval region

पवन मावळातील किल्ले तिकोणा गडावर ३० फूट उंच भगवा ध्वजाची उभारणी

October 24, 2026
Khel Rangla Paithanicha event organized at Shri Marimata Temple Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : श्री मरिमाता मंदिर येथे “खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन

October 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.