Dainik Maval News : लोणावळा विभागाचे मुख्य वाणिज्य निरीक्षक शिरीष कांबळे यांच्या सहकार्याने नेरळ ते खोपोली रेल्वे स्थानकांदरम्यान सकाळी 9 ते 12 वाजेदरम्यान तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे 151 विनातिकीट रेल्वे प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
यासह त्या 151 विनातिकीट रेल्वे प्रवाशांकडून सुमारे 34 हजार 90 रुपये इतक्या दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. सदर तिकीट तपासणी मोहीमेत लोणावळा विभागाचे मुख्य वाणिज्य निरीक्षक शिरीष कांबळे, सहा तिकीट तपासणीस, आरपीएफ व जिआरपी कर्मचारी उपस्थित होते.
विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई केली जाते. विनातिकीट प्रवास करुन आपली तसेच आपल्या देशाची फसवणुक करु नका. योग्य तिकीट काढुन आपला प्रवास सुनिश्चित व सुरक्षित करा, असे आवाहन वाणिज्य निरीक्षक शिरीष कांबळे यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभा : तळेगाव शहरातील आमदार सुनील शेळके यांचा ‘रोड शो’ ठरणार ‘गेम चेंजर’
– मायबाप जनतेने मतदानरुपी आशीर्वाद द्यावेत ; प्रचाराची सांगता करताना आमदार शेळकेंचे भावनिक आवाहन
– ‘बापूसाहेब भेगडे यांचे सक्षम नेतृत्व लाभल्यास मावळ समृद्ध होईल’