Dainik Maval News : खोपोली शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या साजगाव – ताकई येथील प्रसिद्ध धाकटी पंढरी अर्थात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिराजवळ पंधरा दिवसांची यात्रा सुरु आहे. राज्यभर प्रसिद्ध असलेल्या या यात्रेसाठी अनेक जिल्ह्यातून आणि पंचक्रोशीतून भाविकभक्त, नागरिक येत आहेत. सोमवारी (दि.18) साजगाव येथील यात्रेसाठी माथेरान येथून दुचाकीवर आलेल्या तीन युवकांचा अपघात झाला असून अपघातात दोन युवकांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोमवारी माथेरान येथील सहा युवक दोन दुचाकीवर साजगावच्या यात्रेसाठी आले होते. यात्रा पाहून परतीच्या मार्गावर असताना महड फाट्याच्या पुढे समोर उभ्या असेल्या टेम्पोला एका दुचाकीची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुरा झाला. अपघातात माथेरान येथील अजय आखाडे (वय 16) आणि दर्शन वेताळ (वय 16) या दोन अल्पवयीन युवकांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे.
उपचारासाठी जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत आणखीन एख युवक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुसरीकडे अल्पवयीन युवकांच्या बेदकारपणे आणि ट्रिपलसीट वाहने दामटण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शाळा महाविद्यालये येथे याबाबत प्रबोधन होण्याची मागणी जोर धरत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभा : तळेगाव शहरातील आमदार सुनील शेळके यांचा ‘रोड शो’ ठरणार ‘गेम चेंजर’
– मायबाप जनतेने मतदानरुपी आशीर्वाद द्यावेत ; प्रचाराची सांगता करताना आमदार शेळकेंचे भावनिक आवाहन
– ‘बापूसाहेब भेगडे यांचे सक्षम नेतृत्व लाभल्यास मावळ समृद्ध होईल’